Join us  

IPL 2022: आयपीएलमध्ये भूतानचा खेळाडू नशीब आजमावणार, धोनीची घेतली भेट

IPL 2022: आयपीएल २०२२चा  लिलाव १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान बंगळुरू येथे होणार आहे, यावेळी एकूण १२१४ खेळाडू आयपीएल लिलावात सहभागी होणार आहेत.  भारताचे ८९६ आणि ३१८ विदेशी खेळाडू असतील. ३१८ परदेशी खेळाडूंपैकी एक खेळाडू भूतानचाही आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 7:36 AM

Open in App

नवी दिल्ली :  आयपीएल २०२२चा  लिलाव १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान बंगळुरू येथे होणार आहे, यावेळी एकूण १२१४ खेळाडू आयपीएल लिलावात सहभागी होणार आहेत.  भारताचे ८९६ आणि ३१८ विदेशी खेळाडू असतील. ३१८ परदेशी खेळाडूंपैकी एक खेळाडू भूतानचाही आहे. मिक्यो दोरजी असे या खेळाडूचे नाव आहे. गेल्या वर्षी दोरजी भूतानचा असा पहिला क्रिकेटपटू बनला होता, ज्याने देशाबाहेर फ्रेंचाइजी क्रिकेट लीग खेळण्याचा मान मिळवला होता. दोरजी नेपाळला जाऊन एव्हरेस्ट प्रीमियर लीग खेळला. या लीगमध्ये दोरजी ललितपूर देशभक्त संघाकडून खेळताना दिसला. आता दोरजीने आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली.२२ वर्षीय मिक्यो दोरजीने त्याच्या इंस्टाग्रामवर धोनीसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. भूतानच्या या खेळाडूने धोनीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, ‘माहीने दिलेला सल्ला मी कधीही विसरणार नाही. माझ्या कारकिर्दीत मी या सल्ल्याचे पालन करेन.’

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीभूतान
Open in App