Join us  

IPL 2022 : आयपीएलच्या पुढील पर्वात १० नाही ९ संघच खेळणार?; नव्यानं दाखल झालेल्या दोन फ्रँचायझींपैकी एकाचा पत्ता कट होणार

IPL 2022: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वाची सर्व तयारी झाली आहे. ८ संघांना त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 10:26 AM

Open in App

IPL 2022: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वाची सर्व तयारी झाली आहे. ८ संघांना त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. लखनौ व अहमदाबाद या नव्या फ्रँचायझी दाखल झाल्या आहेत आणि त्यामुळे आयपीएल २०२२चा फॉरमॅटही बदलणार आहे. अहमदाबाद फ्रँचायझी पांड्या बंधु, श्रेयस अय्यर, शिखर धवन या खेळाडूंसह  टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना करारबद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत. पण, या फ्रँचायझीचं भवितव्य संकटात सापडले आहे. Irelia Company Pte Ltd (CVC Capital Partners) या कंपनीनं अहमदाबाद फ्रँचायझीचे मालकी हक्क मिळवले आहेत. मात्र, बीसीसीआयनं अजूनही या फ्रँचायझीला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे आयपीएल २०२२त १० नाही तर ९ संघ खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत. InsideSportशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की,''याबाबत मला विचारू नका,  सचिवांना विचारा. अहमदाबाद आयपीएल टीमबाबात आम्ही अनभिद्न आहोत.'' 

CVC Capital ने २५ ऑक्टोबरला ५६२५ कोटींत खरेदी केलं होतं. पण, या कंपनीची बेटींग ( सट्टा लावणारी) कंपनीत गुंतवणूक असल्यानं नवा वाद सुरू झाला होता. आयपीएलचे माजी अध्यक्ष  ललित मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित करताना बीसीसीआयवर टीका केली होती. अद्याप बीसीसीआयकडून  या मुद्यावर कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, ही फ्रँचायझी रद्द केल्यास पुढील पर्वात केवळ ९ संघ खेळताना दिसतील किंवा नव्या फ्रँचायझीला हक्क दिले जाऊ शकतात.

२५ ऑक्टोबरला काय झालं?संजीव गोएंका यांच्या RPSG Group आणि CVC Capital यांनी विक्रमी किमतीत अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. Indian Premier League मध्ये  ( IPL 2022) आता मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, सनयारझर्स हैदराबाद, किंग्स पंजाब, लखनौ व अहमदाबाद असे दहा संघ खेळणार आहेत.  RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ, तर CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली.  दोन नव्या फ्रँचायझींसाठी १० स्पर्धेत शर्यतीत होते. या नव्या करारानं बीसीसीआयला १२, ६९० कोटींचा फायदा झाला आहे.

 

संबंधित बातम्या

लखनौ, अहमदाबाद फ्रँचायझींची रिकॉर्डतोड बोली; अन्य आठ फ्रँचायझींची किंमत ठरली तुटपूंजी!

IPL 2022 मधील नव्या संघाच्या बोलीवरून वाद; ललित मोदीनं गंभीर आरोप करताना BCCI विचारला जाब

८ फ्रँचायझींना ४ खेळाडूंसाठी दिलंय ४२ कोटींचं बजेट; रोहित शर्मा, विराट कोहली, MS Dhoni यांना फटका?

टॅग्स :आयपीएल २०२१अहमदाबादबीसीसीआय
Open in App