IPL 2022 Retentions : बीसीसीआयनं ८ फ्रँचायझींना दिला एका महिन्याचा कालावधी; ४ खेळाडूंसाठी दिलं ४२ कोटींचंच बजेट

IPL 2022 Retentions : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील पर्वात लखनौ व अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझींचा समावेश होणार असल्यानं Mega Auction होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयनं सध्या खेळत असलेल्या फ्रँचायझींसाठी काही नियम बनवले आहेत आणि त्यानुसार फ्रँचायझींना ४ खेळाडूंना कायम राखता येणार आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील पर्वात लखनौ व अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझींचा समावेश होणार असल्यानं Mega Auction होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयनं सध्या खेळत असलेल्या फ्रँचायझींसाठी काही नियम बनवले आहेत आणि त्यानुसार फ्रँचायझींना ४ खेळाडूंना कायम राखता येणार आहे. मग त्या चारपैकी ३ भारतीय की १ परदेशी, २ भारतीय कि २ परदेशी हा त्या त्या संघांचा निर्णय असेल. पण, आता BCCIनं त्यातही ट्विस्ट आणला आहे. बीसीसीआयनं या चार खेळाडूंसाठी प्रत्येक फ्रँचायझींना एक बजेट आखून दिलं आहे आणि त्यातूनच त्यांना खेळाडू निवडावे लागतील.

८ फ्रँचायझींनी १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत त्यांच्या चार रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं बीसीसीआयकडे सोपवायची आहेत आणि १ ते २५ डिसेंबर या कालावधीत लखनौ व अहमदाबाद या दोन नव्या फ्रँचायझींनी रिलीज केलेल्यांपैकी कोणत्या तीन खेळाडूंना करारबद्ध केलेय, हे स्पष्ट करायचे आहे. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मेगा ऑक्शन होणार आहे.

बीसीसीआयनं यावेळी प्रत्येकी फ्रँचायझीला ९० कोटींची पर्स दिली आहे आणि त्यातच त्यांना संघबांधणी करायची आहे. एक फ्रँचायझी तीनपेक्षा ( कॅप व अनकॅप) अधिक भारतीयांना रिटेन करू शकत नाही, तर किमान दोन परदेशी खेळाडू रिटेन करू शकतात. दोनपेक्षा अधिक अनकॅप भारतीय खेळाडूही घेता येणार नाहीत. नव्या संघांना दिलेल्या मर्यादेत दोन भारतीय व एक परदेशी खेळाडू अशी निवड असायला हवी.

बीसीसीआयनं ८ फ्रँचायझींना चार खेळाडू रिटेन करण्यासाठी ४२ कोटींचा बजेट दिला आहे. ही रक्कम त्यांच्या सॅलरी पर्समधून वजा केली जाईल. समजा एखाद्या फ्रँचायझीनं चार खेळाडू रिटेन केले तर त्यांच्या पर्समधून ४२, तीन खेळाडू रिटेन केले तर ३३ कोटी, दोन खेळाडू रिटेन केल्यास २४ कोटी आणि एक खेळाडू रिटेन केल्यास १४ कोटी वजा केले जातील. अनकॅप खेळाडूला रिटेन केल्यास ४ कोटी वजा होतील.

चार खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १६ कोटी, दुसऱ्यासाठी १२, तिसऱ्यासाठी ८ आणि चौथ्यासाठी ६ कोटी मर्यादा घातली गेली आहे. तीन खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १५ कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठई ११ व तिसऱ्या खेळाडूसाठी ७ कोटी अशी मर्यादा असेल. दोन खेळाडू रिटेन केल्यास १४ व १० अशी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या खेळाडूसाठी मर्यादा असेल. एकच खेळाडू रिटेन केल्यास तो १४ कोटींच्या आतच करावा लागेल.

आता बीसीसीआयच्या या बजेटमध्ये मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला विराट कोहली व चेन्नई सुपर किंग्सला महेंद्रसिंग धोनी हे महागडे खेळाडू बसवायचे आहेत.