Join us

IPL 2022 award winners List : गुजरात टायटन्सने २० कोटी कमावले, Jos Buttler ने सर्वाधिक सहा पुरस्कार जिंकले; पाहा पूर्ण लिस्ट व बक्षीस रक्कम

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने ( GT) आयपीएल २०२२चे जेतेपद नावावर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 01:39 IST

Open in App

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने ( GT) आयपीएल २०२२चे जेतेपद नावावर केले. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या ( ३-१७ व ३४ धावा) जोरावर गुजरातने घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा ( RR) सहज पराभव केला. दोन जीवदान मिळालेल्या शुबमन गिलने ( Shubman Gill) नाबाद ४५ धावांची खेळी केली आणि डेव्हिड मिलरने १९ चेंडूंत नाबाद ३२ धावा करून गुजरातचा विजय निश्चित केला. 

गुजरात टायटन्सने १३१ धावांचे लक्ष्य १८.१ षटकांत सहज पार केले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून  यशस्वी जैस्वाल ( २२), संजू सॅमसन ( १४), देवदत्त पडिक्कल ( २)  हे झटपट बाद झाले. जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावा केल्या.  शिमरोन हेटमायर ( ११), आर अश्विन ( ६) व ट्रेंट बोल्ट (११) व रियान पराग ( १५) हे फार कमाल करू शकले नाही. हार्दिक पांड्याने १७ धावांत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. राजस्थानला ९ बाद १३० धावा करता आल्या. रियान परागने १५ धावा केल्या. साई किशोरने २ षटकांत २० धावांत २, राशिद खानने ४ षटकांत १८ धावांत १, तर शमी ( १-३३) व यश दयाल ( १-१८) यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. 

प्रत्युत्तरात शुबमन गिलला ( ० व १३) दोन जीवदान मिळाले. वृद्धीमान साहा ( ५) व मॅथ्यू वेड ( ८) माघारी परतल्यानंतर हार्दिक पांड्या व शुबमन यांन ५३ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करून गुजरातसाठी पाया सेट केला. त्यानंतर शुबमन व डेव्हिड मिलरने २९ चेंडूंत नाबाद ४७ धावांची भागीदारी करून गुजरातचा ७ विकेट्स व ११ चेंडू राखून विजय पक्का केला. गिल ४३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला, तर मिलरने १९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारांसह नाबाद ३२ धावा केल्या.   

 

IPL 2022 Awards List:

  • विजेता - गुजरात टायटन्सन - २० कोटी
  • उप विजेता - राजस्थान रॉयल्स - १२.५ कोटी
  • ऑरेंज कॅप विजेता - जोस बटलर ( ८६३ धावा) - १० लाख
  • पर्पल कॅप विजेता - युजवेंद्र चहल ( २७ विकेट्स) - १० लाख
  • सर्वाधिक षटकार - जोस बटलर ( ४५ ) - १० लाख   
  • Most Valuable Player - जोस बटलर -  १० लाख
  • Emerging Player of the Year  - उम्रान मलिक - ( २२ विकेट्स) - २० लाख
  • Game-changer of the season - जोस बटलर ( १३१८ गुण) - १० लाख
  • Super striker of the season - दिनेश कार्तिक - १० लाख आणि टाटा पंच गाडी
  • Power player of the season - जोस बटलर - १० लाख  
  • Fairplay award - राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स 
  • सर्वाधिक चौकार - जोस बटलर ( ८३) - १० लाख
  • Fastest delivery of the season- ल्युकी फर्ग्युसन - १०  लाख
  • Catch of the season - एव्हिन लुईस - १० लाख 
टॅग्स :आयपीएल २०२२गुजरात टायटन्सजोस बटलरराजस्थान रॉयल्सयुजवेंद्र चहल
Open in App