Join us

IPL 2022 : ऑक्शनमध्ये दर वर्षी कोट्यवधींना विकला जातो 'हा' प्लेअर; मग IPL मधून अचानक होतो बाहेर!

असे अनेक खेळाडू आहेत, जे दरवर्षी आयपीएलच्या मेगा लिलावात आपले नावे देतात, पण त्यांना कुणी खरेदीदारच मिळत नाही. मात्र, आम्ही या बातमीत ज्या खेळाडूसंदर्भात बोलत आहोत. त्याला खरेदी करण्यासाठी संघांमध्ये अक्षरशः चुरस लागते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 19:16 IST

Open in App

नवी दिल्ली - IPL 2022 ची सुरुवात झाली आहे. या मोसमातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील खेळाडू अत्यंत उत्सुक असतात. आयपीएलच्या मेगा लिलावात प्रत्येक संघानेच खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची उधळण केली आहे. मात्र, फार कमी लोकांना माहित आहे, की असाही एक परदेशी खेळाडू आहे, जो दरवर्षी आयपीएलच्या मेगा लिलावात कोट्यवधींना विकला जातो. पण तो या लीगमधून फार लवकर बाहेरही होतो. 

असे अनेक खेळाडू आहेत, जे दरवर्षी आयपीएलच्या मेगा लिलावात आपले नावे देतात, पण त्यांना कुणी खरेदीदारच मिळत नाही. मात्र, आम्ही या बातमीत ज्या खेळाडूसंदर्भात बोलत आहोत. त्याला खरेदी करण्यासाठी संघांमध्ये अक्षरशः चुरस लागते. आम्ही बोलत आहोत ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) संदर्भात. होय, नेहमीप्रमाणेच हा खेळाडू या हंगामातूनही बाहेर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावर्षीही झाला दुखपतग्रस्त - मिचेल मार्श आयपीएल 2022 मध्ये खेळण्यापूर्वीच दुखापतग्रस्त झाला आहे. आता तो या लीगमधून बाहेर पडण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्शला विकत घेतले आहे. सध्या मार्श पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग आहे. मार्श पाकिस्तानविरुद्ध वनडे आणि टी20 सीरीजपूर्वीच दुखापतग्रस्त झाला आहे. मार्श दिल्ली फ्रेंचायझीचा दिग्गज खेळाडू आहे. दिल्ली कॅपिटल्सने मार्शला 6.50 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. तो बाहेर पडला तर दिल्ली टीमसाठी महाग पडू शकते.

आयपीएल 2020 आणि 2021 मध्येही झाला होता बाहेर -गेल्यावर्षी आयपीएल 2021 पूर्वीही मिचेल मार्शने खेळण्यास नकार दिला होता. तेव्हा तर त्याला दुखापतही झालेली नव्हती, तरीही तो लीगपासून बाहेरच राहिला होता. क्रिकबझनुसार, तेव्हा त्याने, आपण फार काळ बायो-बबलमध्ये (Bio-Bubble) राहू शकत नाही, असे म्हटले होते. यापूर्वी आयपीएल 2020 (IPL 2020)च्या शुरुवातीलाच सामन्या दरम्यान मार्शच्या घोट्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला संपूर्ण लिगमधूनच बाहेर व्हावे लागले होते. 

 

टॅग्स :आयपीएल २०२२दिल्ली कॅपिटल्स
Open in App