Join us

Shardul Thakur, IPL 2022 Auction : 'लॉर्ड' के लिए बजेट नही होता...; युझवेंद्र चहलचे वाक्य खरे ठरले, शार्दूल ठाकूरसाठी तगडी बोली

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी सुरू असलेल्या मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी आतापर्यंत ३६ खेळाडूंसाठी १० फ्रँचायझींनी २७५ कोटी, ४५ लाख रुपये मोजले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 18:38 IST

Open in App

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी सुरू असलेल्या मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी आतापर्यंत ३६ खेळाडूंसाठी १० फ्रँचायझींनी २७५ कोटी, ४५ लाख रुपये मोजले आहेत. सर्वाधिक बोली लावलेल्या टॉप पाच खेळाडूंमध्ये भारताच्या चार खेळाडूंचा समावेश आहे आणि त्यात लॉर्ड शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) १०.७५ कोटींसह चौथ्या क्रमांकावर पटकावले. या लिलावाच्या काही दिवसांआधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यात युझवेंद्र चहल शार्दूलला म्हणाला होता की, भगवान के लिए बजेट नही होता... आणि खरंच शार्दूलला मोठी किंमत मिळाल्याने त्याचे वाक्य खरे ठरले.

दिल्ली कॅपिटल्सने शार्दूलला आपल्या ताफ्यात घेतले. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात शार्दूलसाठी चुरस रंगली होती, परंतु अखेर २ कोटी मुळ किंमत असलेल्या शार्दूलला दिल्लीने १०.७५ कोटींत खरेदी केले. शार्दूल याआधी चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य होता. त्याने आयपीएलमध्ये ६१ सामन्यांत ६७ विकेट्स घेतल्या आहेत.  भारतीय संघाचा उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दूल उत्तम पर्याय म्हणून उभा राहिला आहे. २०१५ व २०१६ मध्ये तो पंजाब किंग्सचा सदस्य होता. आयपीएल २०२१मध्ये त्याने १६ सामन्यांत २१ विकेट्स घेतल्या होत्या.    

टॅग्स :आयपीएल लिलावशार्दुल ठाकूरआयपीएल २०२२
Open in App