Join us

IPL 2022 : 'IPL साठी काहीपण, कारण...', नवीन प्रोमोत धोनी दिसला आगळ्यावेगळ्या रुपात

IPL 2022 : क्रिकेटचे चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या सामन्यांना आता काही दिवस शिल्लक आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 10:30 IST

Open in App

मुंबई: क्रिकेटचे चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे. 26 मार्च ते 29 मे या कालावधीत इंडियन प्रीमिअर लीगचे सामने होणार आहेत. दरम्यान, आयपीएलने त्यांचा आणखी एक प्रोमो रिलीज केला आहे. पहिल्या प्रोमोप्रमाणे यामध्येही सुपरकुल महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) दिसत आहे.

बीसीसीआयने कालच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले. आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये वानखेडे मैदानावर होणार आहे. आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी होणार आहेत. आयपीएलचा जोर वाढू लागला असताना याचे प्रमोशनदेखील जोरात होत आहे. 

आयपीएलच्या पहिल्या प्रोमोप्रमाणे दुसऱ्या प्रोमोनेही इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. यातही महेंद्रसिंह धोनी एका अनोख्या अवतारात दिसून येतोय. आयपीएलच्या या वर्षीच्या सीझनची थीम #YeAbNormalHai अशी आहे. पहिल्या प्रोमोमध्ये धोनी बस ड्रायव्हर म्हणून दाखवण्यात आला होता. तर आता यात तो एका वृद्ध व्यक्तीच्या भूमिकेत दिसत आहे. आयपीएलने हा प्रोमोचा व्हिडीओ शेअर केला आहे. धोनीचा हा भन्नाट लूक पाहून चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२२
Open in App