Join us

IPL 2022: ॲन्डी फ्लॉवर आयपीएल लखनौ संघाचे कोच?

झिम्बाब्वेचे माजी कर्णधार ॲन्डी फ्लॉवर हे आयपीएल २०२२ मध्ये लखनौ या नव्या संघाच्या कोचपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 09:15 IST

Open in App

झिम्बाब्वेचे माजी कर्णधार ॲन्डी फ्लॉवर हे आयपीएल २०२२ मध्ये लखनौ या नव्या संघाच्या कोचपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. फ्लॉवर यांनी पंजाब किंग्जच्या सहाय्यक कोचपदाचा आधीच राजीनामा दिला आहे. मागच्या दोन सत्रात पंजाब संघाचा कर्णधार राहिलेला लोकेश राहुल हा देखील लखनौ संघात दाखल होण्याची शक्यता आहे. 

यासंदर्भात विचारताच संघाच्या एक अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्याकडे अनेक नावे आली आहेत. गॅरी कर्स्टन हे देखील चढाओढीत असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. आम्ही काही लोकांसोबत चर्चा करीत आहोत, मात्र जोपर्यंत करार होत नाही, तोपर्यंत निश्चित नाही. फ्लॉवर हे २०२० च्या आयपीएल आधी पंजाब संघाशी जुळले. मुख्य कोच अनिल कुंबळे यांच्यासोबत दोन वर्षे त्यांनी काम केले. 

फ्लॉवर आणि कर्स्टन यांच्याशिवाय लखनौ संघासाठी  न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेट्टोरी आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांची नावे चर्चेत आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२१झिम्बाब्वे
Open in App