Join us

IPL 2021: तुम्ही कधी जिंकता, कधी हरता; पण नेहमी शिकता!, हा केवळ फोटो नाही...प्रेरणा आहे

IPL 2021: आयपीएल म्हटलं की रोमांच, थरार आणि भावुक क्षणांची अनुभूती देणारी स्पर्धा. आयपीएलनं क्रिकेटमध्ये ग्लॅमर तर आणलंच पण युवा खेळाडूंना जागतिक व्यासपीठ खुलं करुन दिलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 17:47 IST

Open in App

IPL 2021: आयपीएल म्हटलं की रोमांच, थरार आणि भावुक क्षणांची अनुभूती देणारी स्पर्धा. आयपीएलनं क्रिकेटमध्ये ग्लॅमर तर आणलंच पण युवा खेळाडूंना जागतिक व्यासपीठ खुलं करुन दिलं. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सोबत नेऊन बसवलं. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक लाभले आणि त्यातून वैयक्तिक खेळात सुधारणा करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंनाही याची पूर्ण जाणीव असते आणि तेही मिळालेल्या संधीचा पूर्णपणे फायदा घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. 

'शर्ट-लेस' डान्स अन् संगकाराचे मोलाचे शब्द; राजस्थानचं ड्रेसिंग रुममध्ये 'रॉयल' सेलिब्रेशन, पाहा Video

पंजाब किंग्जचा काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव झाला. पंजाब किंग्जनं हातचा सामना अवघ्या दोन धावांनी गमावला. राजस्थानच्या १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सलामीजोडी केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी जोरदार सुरुवात करुन दिली. दोघांनी संघासाठी पाचव्यांदा शतकी भागीदारी रचली. मयांक अग्रवालनं ४३ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांच्या साथीनं ६७ धावा कुटल्या. पंजाबला सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. हातातला सामना गमावल्याची सल पंजाबच्या खेळाडूंच्या मनात नक्कीच असेल. पण एका फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

कोहलीला कर्णधारपदावरुन हटविण्याचा हालचाली?, संघ व्यवस्थापन नाराज

सामना झाल्यानंतर पंजाबचा सलामीवीर मयांक अग्रवाल राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांच्याशी चर्चा करताना पाहायला मिळाला. संगकाराकडून काही टिप्स घेताना मयांक दिसला. कदाचित सामन्यात नेमकं काय चुकलं? किंवा वैयक्तिक खेळीत आणखी कशी सुधारणा करता येईल याबाबत मयांकनं संगकाराशी संवाद साधला असावा. सामन्यात कधी विजय, तर कधी पराभव होत असतो. पण तुमचं त्यातून धडा घेणं, शिक्षण घेणं नेहमीच सुरू असतं, असाच संदेश देणारा हा फोटो नक्कीच प्रेरणादायक आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१मयांक अग्रवालकुमार संगकारापंजाब किंग्स
Open in App