Join us

IPL 2021: सनरायझर्स विरुद्धच्या थराराक सामन्यात चहलच्या पत्नीचा आवाजच जातो तेव्हा...

IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघानं बुधवारच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) विरुद्धच्या रोमांचक सामन्यात ६ धावांनी विजय प्राप्त केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 22:23 IST

Open in App

IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघानं बुधवारच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) विरुद्धच्या रोमांचक सामन्यात ६ धावांनी विजय प्राप्त केला होता. कोहली ब्रिगेडनं हातातून जवळपास गमावलेला सामना अखेरच्या षटकांमध्ये खेचून आणला. रॉयल चॅलेंजर्सनं दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरनं चांगली फलंदाजी करत सामन्यात मजबूत पकड निर्माण केली होती. पण शाहबाज नदीमनं १७ व्या षटकात घेतलेल्या तीन विकेट्स आणि अखेरच्या षटकामध्ये हर्षल पटेलनं केलेली दमदार गोलंदाजीच्या जोरावर कोहली ब्रिगेडनं सामना जिंकला. 

आरसीबीचा स्टार फिरकीपटू यजुवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा देखील संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. सामन्याचा थरार अन् अनुभव धनश्रीनं तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सामन्यातील थराराचं वर्णन करताना धनश्रीनं जवळपास मी आवाजच गमावला होता, असं म्हटलं आहे. 

"प्रतिस्पर्धी संघाला मधल्या षटकांमध्ये जखडून ठेवत आणि अखेरच्या षटकांमध्ये विकेट्स मिळवत आम्ही विजय खेचून आणला. सांघिक कामगिरीमुळे हे सारं शक्य झालं", असं धनश्रीनं आरसीबीच्या कामगिरीचं कौतुक करताना म्हटलं आहे. 

चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात आलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स विरुद्धचा सामना यजुवेंद्र चहलसाठीचा आयपीएलमधील १०० वा सामना होता. सामन्यात चहलला विकेट मिळाली नसली तरी ४ षटकांमध्ये त्यानं २९ धावा दिल्या.  

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरयुजवेंद्र चहलआयपीएल २०२१