Join us

IPL 2021 : विराट कोहली नव्या भूमिकेत, तीन युवा खेळाडूंचा बनला गुरू व मेंटॉर; जाणून घ्या नेमकं काय

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा टीम इंडियाच्या मार्गदर्शकाच्या ( Mentor) भूमिकेत दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 16:17 IST

Open in App

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा टीम इंडियाच्या मार्गदर्शकाच्या ( Mentor) भूमिकेत दिसणार आहे. बीसीसीआयनं वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करताना धोनीवरील जबाबदारीची माहिती देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विराट कोहली ( Virat Kohli) चा आयसीसी स्पर्धेतील दुष्काळ संपवण्यासाठी धोनी मदत करणार आहे. पण, सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये विराट कोहली तीन खेळाडूंचा गुरू व मेंटॉर बनलेला पाहायला मिळत आहे. आयपीएल २०२१त विराट त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अनुभव युवा खेळाडूंसोबत शेअर करताना व त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहे.  

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल यानं मागील पर्वात उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याचा आत्मविश्वास बोलका आहे आणि त्याच्या बॅटीतून निघणाऱ्या धावांतून तो अधिक उंचावत चालला आहे. भविष्यातील स्टार म्हणून देवदत्तकडे पाहिले जाऊ लागले आहे आणि RCBचा कर्णधार विराट त्याचा वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे.  

कोलकाता नाइट रायडर्सचा वेंकटेश अय्यर याचं नाव यावेळी सर्वांच्या तोंडी आहे. त्याची अफलातून फटकेबाजी भल्या भल्या गोलंदाजांना हैराण करून सोडतेय. KKR vs RCB या सामन्यानंतर अय्यरला कर्णधार विराटकडून महत्त्वाच्या टीप्स मिळाल्या आहेत. त्याचा त्याला भविष्यात नक्की फायदा होईल.

  भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी खेळाडू यशस्वी जैस्वाल यालाही विराटचे मार्गदर्शन मिळत आहे. RR vs RCB सामन्यात विराटकडून युवा फलंदाज यशस्वीनं काही मौलव्यान टीप्स घेतल्या.  

टॅग्स :आयपीएल २०२१विराट कोहली
Open in App