ठळक मुद्देभरत ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ७८ धावांवर नाबाद राहिला, तर मॅक्सवेलनं ३३ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या.
IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं ( RCB) शुक्रवारी अखेरच्या चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सला ( DC) हार मानण्यास भाग पाडले. श्रीकर भरत व ग्लेन मॅक्सवेल यांनी RCBला हा थरारक विजय मिळवून दिला. १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भरतनं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून RCBचा विजय पक्का केला. या रोमहर्षक विजयानंतर कर्णधार विराट कोहलीनंही भारी जल्लोष केला. त्याच्या या जल्लोषाचा व्हिडोओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय..
पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या दहा षटकांत ८८ धावा चोपल्या. पण, ही दोघं माघारी परतली अन् दिल्लीची गाडी घसरली. धवन ४३ तर पृथ्वी ४८ धावा करून बाद झाला. शिमरोन हेटमायरनं २९ धावा करत DC ला ५ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात
विराट कोहली व देवदत्त पडिक्कल RCBचे दोन्ही सलामीवीर ६ धावांवर माघारी परतले. श्रीकर भरत आणि एबी डिव्हिलियर्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. अक्षर पटेलनं ही जोडी तोडताना एबीला २६ धावांवर माघारी परतला. भरतनं चौथ्या विकेटसाठी ग्लेन मॅक्सवेलच्या साथीनं शतकी भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.
अखेरच्या षटकातील थरार...
आवेश खाननं टाकलेल्या २०व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर मॅक्सवेलनं ६ धावा करताना वैयक्तिक अर्धशतकासह भरतसह शतकी भागीदारी पूर्ण केली. आवेशनं तिसरा चेंडू यॉर्कर फेकला अन् मॅक्सवेलसाठी LBWची अपील झाली. DCनं त्यासाठी DRS घेतला. मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये २००० धावांचा पल्लाही पार केला. भरत स्ट्राईकवर असताना आवेशनं चौथा चेंडू निर्धाव फेकला आणि आता RCBला २ चेंडूंत ८ धावा करायच्या होत्या. पाचव्या चेंडूवर दोन धावा मिळाल्या, त्यात एक Wide चेंडू फेकला गेला. त्यामुळे १ चेंडू ५ धावा असा सामना आला. अखेरच्या फुलटॉसवर भरतनं षटकार खेचून RCBला ७ विकेट्सनं विजय मिळवून दिला.
विराट कोहलीचं सेलिब्रेशन...