Join us  

IPL 2021 : विराट कोहलीचं 'बेबी सेलिब्रेशन'; पाहा RCBच्या डग आऊटमधील इमोशन, Video 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात गुरुवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं राजस्थान रॉयल्सवर सहज विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 3:40 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात (IPL 2021) गुरुवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore) संघानं राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) सहज विजय मिळवला. आयपीएलच्या या पर्वात आतापर्यंत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCBनं चारही सामने जिंकून अपराजित राहणाऱ्या एकमेव संघाचा मान पटकावला आहे. त्यामुळे RCB ८ गुणांसह Point Tableमध्ये अव्वल स्थानावर आहे.  वानखेडेवर आंद्रे रसेलचं वादळ घोंगावलं, ९ चेंडूंत चोपल्या ४८ धावा; पण, विचित्र पद्धतीनं झाला बाद, Video 

RCBनं पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर २ विकेट्स राखून, त्यानंतर सनरायझर्स हैदराबादवर ६ धावांनी आणि कोलकाता नाईट रायडर्सवर ३८ धावांनी विजय मिळवला. गुरुवारी त्यांनी राजस्थान रॉयल्सवर १० विकेट्स राखून विजयी चौकार मारला. प्रथम फलंदाजीला आलेल्या RRचे चार फलंदाज ४३ धावांवर माघारी परतले होते, परंतु शिवम दुबे ( ४६), राहुल टेवाटिया ( ४०) व रियान पराग ( २५) यांनी दमदार खेळ करताना संघाला १७७ धावांपर्यंत मजल मारून दिली.

१७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना देवदत्त पडीक्कल व विराट कोहली या दोघांनीच RCBचा विजय पक्का केला. देवदत्तनं ५२ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकार खेचून नाबाद १०१ व विराटनं ४७ चेंडूंत ७३ धावा चोपल्या. आयपीएल २०२१मधील त्याचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. शिवाय आयपीएलमध्ये ६००० धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. विराट कोहलीनं त्याचं अर्धशतक मुलगी वामिकाला समर्पीत केलं. अर्धशतकानंतर विरानं बेबी सेलिब्रेशन केलं आणि अनुष्का शर्माला फ्लाईंग किस दिला.

पाहा व्हिडीओ..

For Vamika 💝

Virat Kohli • #RCBvRR • #IPL2021

Posted by ViratGang on Thursday, April 22, 2021

टॅग्स :आयपीएल २०२१विराट कोहलीअनुष्का शर्मारॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स