IPL 2021, CSK vs KKR T20 : वानखेडेवर आंद्रे रसेलचं वादळ घोंगावलं, ९ चेंडूंत चोपल्या ४८ धावा; पण, विचित्र पद्धतीनं झाला बाद, Video 

IPL 2021  t20 Csk vs KKR live match score updates mumbai : २२० धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था ५ बाद ३१ अशी दयनीय झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 10:52 PM2021-04-21T22:52:11+5:302021-04-21T22:52:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, CSK vs KKR T20 : Andre Russell in disbelief after getting bowled from an outstanding delivery, he score 54 runs on 22ball with 3x4 6x6, Video | IPL 2021, CSK vs KKR T20 : वानखेडेवर आंद्रे रसेलचं वादळ घोंगावलं, ९ चेंडूंत चोपल्या ४८ धावा; पण, विचित्र पद्धतीनं झाला बाद, Video 

IPL 2021, CSK vs KKR T20 : वानखेडेवर आंद्रे रसेलचं वादळ घोंगावलं, ९ चेंडूंत चोपल्या ४८ धावा; पण, विचित्र पद्धतीनं झाला बाद, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021  t20 Csk vs KKR live match score updates mumbai : २२० धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था ५ बाद ३१ अशी दयनीय झाली होती. त्यानंतर आंद्रे रसेल ( Andre Russell ) मैदानावर आला अन् वादळासारखा घोंगावला. आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत एकही षटकार न खेचणाऱ्या रसेलनं ६ खणखणीत षटकार खेचले. त्यानं २२ चेंडूंत ५४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ९ चेंडूंत ४८ धावा ( ३ चौकार व ६ षटकार) आल्या. पण, सॅम कुरणच्या चेंडूवर तो विचित्र पद्धतीनं बाद झाला आणि त्यानंतर वानखेडेच्या पायऱ्यांवर हतबल बसून राहिला.  IPL 2021 : CSK vs KKR T20 Live Score Update

दीपक चहरचा कहर...
२२० धावांचे ओझे कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना पेलवलं नाही. शुबमन गिल ( ०), नितीश राणा ( ९), कर्णधार इयॉन मॉर्गन (७) व सुनील नरीन ( ४) यांना दीपक चहरनं बाद करून कहर केला. त्यानं ४ षटकांत २९ धावांवर ४ विकेट्स घेतल्या. आयपीएल २०२१त पहिलाच सामना खेळणाऱ्या लुंगी एनगिडीनं राहुल त्रिपाठीला बाद करून कोलकाताचा निम्मा संघ ३१ धावांत माघारी परतला होता. पण, विकेट पडल्यानंतरही KKRच्या धावांची गती CSKसाठी चिंताजनक होती. IPL 2021 : CSK vs KKR T20 Live Score Update

आंद्रे रसेलची आतषबाजी...
निम्मा संघ ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर दिनेश कार्तिक व आंद्रे रसेल ही जोडी CSKच्या गोलंदाजांना भिडली. रसेलनं २१ चेंडूंत अर्धशतक झळकावले. यंदाच्या आयपीएलमधील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. पंजाब किंग्सच्या दीपक हुडानं २० चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.  पण, सॅम कुरननं १२ व्या षटकात रसेलची विकेट घेतली. रसेलनं २२ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ५४ धावा केल्या. रसेलची ही विकेट KKRसाठी वेदनादायी ठरली. कुरनचा डाव्या बाजूनं जाणार चेंडू सोडणं रसेलला महागात पडलं अन् त्याचा त्रिफळा उडाला. 

पाहा व्हिडीओ..


ऋतुराजचा फॉर्म परतला...
मागील तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडनं आज चांगली सुरुवात करून दिली. त्यानं फॅफ ड्यू प्लेसिससह पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. ऋतुराज ४२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर बाद झाला. मोईन अलीनं फॅफसह दुसऱ्या विकेटसाठी २७ चेंडूंत ४६ धावांची भागीदारी केली. अली १२ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून २५ धावांवर बाद झाला. IPL 2021 latest news, CSK vs KKR IPL Matches

फॅफ ड्यू प्लेसिस ९५ धावांवर नाबाद...
महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आज फलंदाजीला चौथ्या क्रमांकावर आला. धोनी ८ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचून १७ धावांवर माघारी परतला. १९व्या षटकात आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर कर्णधार इयॉन मॉर्गननं अप्रतिम झेल टिपला. फॅफनं अखेरच्या षटकात फटकेबाजी कायम राखताना चेन्नईला २० षटकांत ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा करून दिला. फॅफ ६० चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह ९५ धावांवर नाबाद राहिला. 
 

Web Title: IPL 2021, CSK vs KKR T20 : Andre Russell in disbelief after getting bowled from an outstanding delivery, he score 54 runs on 22ball with 3x4 6x6, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.