Join us

BIG BREAKING: कोलकाताच्या संघात कोरोनाचे थैमान, खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; IPLचा आजचा सामना रद्द

IPL 2021, RCB vs KKR: IPL 2021 Varun, pat cummins and Sandeep test positive for COVID 19 KKR vs RCB match is postponed: आयपीएलच्या मैदनातून मोठी घडामोड समोर आली आहे. कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 12:28 IST

Open in App

IPL 2021, RCB vs KKR: आयपीएलच्या मैदनातून मोठी घडामोड समोर आली आहे. कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबत आणखी काही खेळाडूंची तब्येत बिघडल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आयपीएलचा कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यातील आजचा सामना रद्द करण्यात आला आहे. आजचा नियोजित सामना पुढे ढकलण्यात आल्याची अधिकृत माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. (IPL 2021 Varun and Sandeep test positive for COVID 19KKR vs RCB match is postponed)

आयपीएलमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यात लढत होणार होती. पण  कोलकोता संघातील दोन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं दोघंही आता विलगीकरणात गेले आहेत. यासोबत त्यांच्यासोबतच्या इतर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. पण खबरदारी म्हणून आजचा सामान होऊ शकणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, केकेआरच्या संघातील वरुण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स  Pat Cummins देखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची माहिती ऑस्ट्रेलियातील एका वृत्तसंस्थेनं दिली आहे. केकेआरच्या संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं देखील आजचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१कोरोना वायरस बातम्याकोलकाता नाईट रायडर्स