Join us  

IPL 2021 : विश्वास ठेवा,  केकेआरने सर्वात पहिल्या सामन्यानंतर शतकच केलेले नाही? 

Kolkata Knight Riders Records : आयपीएलच्या (IPL 2021) शेकडो सामन्यांमध्ये आतापर्यंत हजारो विक्रम झाले आहेत पण कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) एक विक्रम आहे जो तुम्हाला चकित केल्याशिवाय राहणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 2:15 PM

Open in App

- ललित झांबरे

आयपीएलच्या (IPL 2021) शेकडो सामन्यांमध्ये आतापर्यंत हजारो विक्रम झाले आहेत पण कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) एक विक्रम आहे जो तुम्हाला चकित केल्याशिवाय राहणार नाही. तो विक्रम म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील अगदी सर्वात पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजाने शतक झळकावले खरे, पण त्यानंतर आजतागायत आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या इतर कोणत्याही फलंदाजाला शतक झळकावता आलेले नाही. याप्रकारे आयपीएलच्या 13 वर्षांच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांच्या नावावर एकच शतक आहे. तेसुध्दा अगदी पहिल्या सामन्यातले! (unbelievable, KKR has not scored a century since its first match?)

आयपीएल जे फॉलो करतात त्यांना आठवत असेल की 18 एप्रिल 2008 रोजी आयपीएलचा शुभारंभ झाला होता. त्यावेळी बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कोलकात्याच्या सलामीवीर ब्रेंडन मॕक्युलमने (Brendon Macculum)ने 158 धावांची वादळी खेळताना राॕयल चॕलेंजर्स बंगलोरच्या (RCB)  गोलंदाजांची पिसे काढली होती. मात्र त्यानंतर केकेआरचा कोणताही फलंदाज शतक लावू शकलेला नाही आणि असा आयपीएलच्या इतिहासातील हा एकमेव संघ आहे. 

त्यानंतर केकेआरतर्फे 2019 मध्ये दिनेश कार्तिकने 97 धावांची खेळी (वि. राजस्थान राॕयल्स) केली, 2014 मध्ये मनिष पांडेने 94 धावांची खेळी (वि. किंग्ज) केली. ख्रिस लिनने 93, गौतम गंभीरने 93 व 91, एम.एस. बिस्ला याने 92, सौरव गांगुलीने 91 धावांची खेळी केली पण शतक कुणालाही करता आलेले नाही. आता यावेळी तरी केकेआरचा शतकांचा दुष्काळ संपेल का?

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्सब्रेन्डन मॅक्युलमटी-20 क्रिकेट