चेन्नई : विजयाने सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) संघाला आयपीएलच्या १४ व्या पर्वात बुधवारी सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. आरसीबीने पाचवेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्सचा पराभव करीत स्पर्धेत विजयी सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायजर्स संघाला सलामी लढतीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या लढतीत शानदार कामगिरी करणाऱ्या आरसीबी संघाची फलंदाजीची बाजू अधिक मजबूत झाली आहे. प्रतिभावान फलंदाज देवदत्त पडिक्कल कोरोनातून सावरला असून त्याचे संघात पुनरागमन झाले आहे.