Join us

IPL 2021 Suspended : इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलरकडून RRचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला खास भेट; Pic Viral

जोस बटलरनं २५४ धावा केल्या. १२४ ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. यशस्वीला तीन सामन्यांत ६६ धावा करता आल्या आणि ३२ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 15:32 IST

Open in App

IPL 2021 Suspended : इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलरने (Jos Buttler) राजस्थान रॉयल्स ( RR) संघातील सहकारी व भारताचा युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल याला (Yashsvi Jaiswal) मायदेशात परतण्यापूर्वी एक खास भेटवस्तू दिली आहे. आयपीएलमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या बटलरनं त्याची बॅट यशस्वीला भेट दिली. तुझ्या प्रतिभेवर विश्वास ठेव, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असा संदेस बटलरनं त्या बॅटवर लिहिला आहे.  राजस्थान रॉयल्सने ७ सामन्यांत केवळ ३ विजय मिळवले आहेत.  जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, अँड्य्रू टाय व लायम लिव्हिंगस्टोन हे चार परदेशी खेळाडू एकामागोमाग माघारी परतले. उर्वरित चार परदेशी खेळाडूंसह हा संघ मैदानावर उतरला. संजू सॅमसननं सातत्या राखल्यास हा संघ काही करू शकतो, पण त्याला ते जमताना दिसत नाही. RRच्या फलंदाजीची भीस्त पूर्णपणे संजू सॅमसन व जोस बटलर यांच्यावर होती. शिवम दुबे, राहुल टेवाटिया, यशस्वी जैस्वाल, रियान पराग व डेव्हिड मिलर यांना अपेक्षित साथ देता येत नाही. ख्रिस मॉरिस, मुस्ताफिजूर रहमान, चेतन सकारिया, जयदेव उनाडकट यांनाही साजेशी कामगिरी करता आली नाही.

संजू सॅमसननं १ शतकासह ( ११९) ७ सामन्यांत २७७ धावा केल्या. त्यापाठोपाठ जोस बटलरनं २५४ धावा केल्या. १२४ ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. यशस्वीला तीन सामन्यांत ६६ धावा करता आल्या आणि ३२ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सजोस बटलर