Join us

IPL 2021: सनरायझर्सचा आत्मविश्वास आणि संयम कायम - बेलिस

सनरायझर्सने सहापैकी पाच सामने गमावल्याने गुणतालिकेत हा संघ अखेरच्या स्थानावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 06:52 IST

Open in App

नवी दिल्ली : ‘सलग पाच सामने गमाविल्यानंतरही माझ्या संघाने आत्मविश्वास आणि संयम गमावलेला नाही, ही महत्त्वपूर्ण बाब आहे,’ असे मत सनरायझर्स हैदराबादचे मुख्य कोच ट्रॅव्हर बेलिस यांनी व्यक्त केले आहे.

माझा संघ मुसंडी मारणार नाही, असे कुठलेही कारण मला दिसत नसल्याचे सांगून बेलिस म्हणाले ,‘तुम्ही पाचही सामन्यावर नजर टाका, यापैकी चार सामने आम्ही दहा धावांच्या फरकाने गमावले. दोन सामन्यात झेल सोडले शिवाय क्षेत्ररक्षणही खराब झाले. केवळ चेन्नई सुपरकिंग्जकडून आम्ही सहजपणे पराभूत झालो.’

सनरायझर्सने सहापैकी पाच सामने गमावल्याने गुणतालिकेत हा संघ अखेरच्या स्थानावर आहे. ‘संघात अधिक बदल करण्याची गरज नाही. केवळ चर्चेद्वारे शंकानिरसन होईल. संघ संयोजन बनविण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जातील’ असे बेलिस यांनी सांगितले.बुधवारी सीएसकेकडून ७ गड्यांनी झालेल्या पराभवाबाबत ते म्हणाले,‘ आम्ही सहज पराभूत झालो, मात्र संयम आणि आत्मविश्वास गमावला नाही. सांघिकपणे कठोर मेहनत घेणे सुरूच आहे. टी-२०त पारडे फिरण्यास वेळ लागत नाही. मागच्या वर्षी सारखी मुसंडी मारु शकणार नाही, असे कुठलेही कारण दिसत नाही.’ 

टॅग्स :आयपीएल २०२१सनरायझर्स हैदराबाद