IPL 2021, SRH vs RR Live Updates : संजू सॅमसन खतरनाक खेळला; वर्ल्ड कप संघासाठी दावा ठोकला, इशान किशनचं वाढवलं टेंशन 

राजस्थान रॉयल्सच्या ( RR) संजू सॅमसननं ( Sanju Samson) आज सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 09:13 PM2021-09-27T21:13:16+5:302021-09-27T21:13:43+5:30

IPL 2021, SRH vs RR Live Updates : Sanju Samson is the orange cap holder in IPL2021, RR posted 164 for 5   | IPL 2021, SRH vs RR Live Updates : संजू सॅमसन खतरनाक खेळला; वर्ल्ड कप संघासाठी दावा ठोकला, इशान किशनचं वाढवलं टेंशन 

IPL 2021, SRH vs RR Live Updates : संजू सॅमसन खतरनाक खेळला; वर्ल्ड कप संघासाठी दावा ठोकला, इशान किशनचं वाढवलं टेंशन 

Next

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Updates : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड झालेला इशान किशन फॉर्माशी झगडताना दिसत आहे. त्यात १० ऑक्टोबरपर्यंत संघांना त्यांच्या खेळाडूंमध्ये बदल करता येणं शक्य आहे आणि टीम इंडियातही बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. अशात राजस्थान रॉयल्सच्या ( RR) संजू सॅमसननं ( Sanju Samson) आज सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई केली. त्याच्या आजच्या वादळी खेळीनं निवड समितीला त्याच्या नावाचा फेरविचार करण्यास भाग नक्की पाडले असावे आणि त्यामुळे इशान किशनचे टेंशनही वाढणे साहजिक आहे. 

सूर्यकुमार, इशान, हार्दिक यांना वर्ल्ड कप संघातून वगळले जाऊ शकते का?; जाणून घ्या ICCचा नियम

दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नरला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी आज जेसन रॉयनं ( Jason Roy makes his SRH debut.) पदार्पण केले. RRच्या संघात तीन बदल पाहायला मिळत आहेत. डेव्हिड मिलर, तब्रेझ शम्सी व कार्तिक त्यागी आजच्या सामन्याला मुकणार. ख्रिस मॉरिस, एव्हीन लुईस यांचे कमबॅक झाले आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, लुईस दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. भुवनेश्वर कुमारनं त्याची विकेट घेतली. त्यानंतर यशस्वी जैस्वाल व कर्णधार संजू सॅमसन यांनी संयमी खेळ करत विकेट टिकवली. राजस्थाननं ७ षटकांत १ बाद ५७ धावा केल्या. 

जैस्वालचा फॉर्म परतल्यानं राजस्थानच्या ताफ्यात आनंद होते. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर त्यानं खणखणीत षटकारही लगावला, परंतु पुढच्याच चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. जैस्वालनं २३ चेंडूंत ३६ धावा केल्या. लिएम लिव्हिंगस्टोन ( ४) हा पुन्हा अपयशी ठरला अन् राशिद खानच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. पण, सॅमसनला तो रोखू शकला नाही. RRच्या कर्णधारानं ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून यंदाच्या पर्वात ४०० धावांचा पल्ला पार केला. शिखर धवन व लोकेश राहुल यांनाच हा टप्पा ओलांडता आला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्यानं अव्वल क्रमांक पटकावला. ( Sanju Samson now becomes the highest-run getter in IPL 2021) 

सिद्धार्थ कौल यानं टाकलेल्या १६ व्या षटकात सॅमसन यानं दोन षटकार व १ चौकारांसह २० धावा कुटल्या. त्यानं SRHचा यशस्वी गोलंदाज जेसन होल्डरलाही नाही सोडले. महिपाल लोम्रोर याची त्याला उत्तम साथ मिळाली. सॅमसन ५७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावांवर बाद झाला. कौलनेच त्याची विकेट घेतली. राजस्थाननं ५ बाद १६४ धावा केल्या. लोम्रोर २९ धावा केल्या. RRला अखेरच्या तीन षटकांत १८ धावाच करता आल्या. 

Web Title: IPL 2021, SRH vs RR Live Updates : Sanju Samson is the orange cap holder in IPL2021, RR posted 164 for 5  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app