Join us  

IPL 2021, SRH vs PBKS Live Updates : Catch Win Match!; जे सुचिथ व संदीप शर्मा यांच्या अफलातून झेलनी पंजाब किंग्सची वाट लावली, Video 

सनरायझर्स हैदराबादच्या क्षेत्ररक्षकांनीही अफलातून झेल टिपले. बदली खेळाडू म्हणून आलेला जे सुचिथ या सामन्यात सुपर हिरो ठरला, तर संदीप शर्मानंही अफलातून झेल टिपला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 9:28 PM

Open in App

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सच्या ( PBKS) फलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. जेसन होल्डरनं तीन महत्त्वाच्या विकेट्स घेत पंजाबला २० षटकांत ७ बाद १२५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.  सनरायझर्स हैदराबादच्या क्षेत्ररक्षकांनीही अफलातून झेल टिपले. बदली खेळाडू म्हणून आलेला जे सुचिथ या सामन्यात सुपर हिरो ठरला, तर संदीप शर्मानंही अफलातून झेल टिपला. 

जेसन होल्डरनं डाव पलटवला, पंजाब किंग्सला प्ले ऑफमधून बाहेर काढण्याचा खड्डा खणला

पंजाब किंग्सच्या फलंदाजानी निराश केले. लोकेश राहुल व मयांक अग्रवाल पुन्हा एकदा पंजाबला स्फोटक सुरुवात करून देतील अशी अपेक्षा होती. मात्र, जेसन होल्डरनं दोघांनाही माघारी पाठवलं. पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लोकेश ( २१) बाद झाला, तर पाचव्या चेंडूवर मयांक ( ५) माघारी परतला. ख्रिस गेलकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु तोही राशिद खानच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला अन् १४ धावांवर तंबूत परतला. निकोलस पूरनचा ( ८) अपयशाचा पाढा कायम राहिला अन् अब्दुल समदनं त्याची विकेट घेतली. एडन मार्कराम ( २७) याला संदीप शर्मानं स्वतःच्याच गोलंदाजीवर अफलातून झेल घेत माघारी पाठवून पंजाबची अवस्था ५ बाद ८८ अशी केली.

१६व्या षटकात कर्णधार केन विलियम्सननं पुन्हा होल्डरला पाचारण केलं अन् त्यानं दीपक हुडाची विकेट मिळवून दिली. बदली खेळाडू जे सुचिथनं अफलातून झेल टिपला. त्यानंतर पंजाब किंग्सला डोकं वर काढणं अवघड गेलं अन् त्यांनी कशाबशा ७ बाद १२५ धावा करता आल्या. होल्डरनं १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. २७ धावा करणारा मार्कराम हा पंजाबकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

पाहा अफलातून झेल...

टॅग्स :आयपीएल २०२१सनरायझर्स हैदराबादपंजाब किंग्स
Open in App