IPL 2021, SRH vs PBKS Live Updates : जेसन होल्डरनं दिले सॉलिड धक्के; हैदराबादसमोर पंजाबची गाडी रुळावरून घसरली 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 09:11 PM2021-09-25T21:11:21+5:302021-09-25T21:12:37+5:30

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सच्या ( PBKS) फलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली.

IPL 2021, SRH vs PBKS Live Updates: : Punjab Kings 125/7 (20 overs) against SunRisers Hyderabad; jason Holder (3/19 | IPL 2021, SRH vs PBKS Live Updates : जेसन होल्डरनं दिले सॉलिड धक्के; हैदराबादसमोर पंजाबची गाडी रुळावरून घसरली 

IPL 2021, SRH vs PBKS Live Updates : जेसन होल्डरनं दिले सॉलिड धक्के; हैदराबादसमोर पंजाबची गाडी रुळावरून घसरली 

Next

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सच्या ( PBKS) फलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. जेसन होल्डरनं सुरुवातीला धक्के दिल्यानंतर राशिद खान व संदीप शर्मा यांनी मधली फळी खिळखिळीत केली. त्यामुळे पंजाबला प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यात आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. 

 IPLला टक्कर देण्यासाठी रमीझ राजा यांनी तयार केला मास्टर प्लान; PSLवर पाडणार पैशांचा पाऊस

सनरायझर्स हैदबादानं ( SRH) आता कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे प्ले ऑफचे स्वप्न पूर्ण होणारे नाहीत. पण, त्यांनी मिळवलेला प्रत्येक विजय अन्य संघाचं प्ले ऑफचं गणित बिघडवू शकतो. त्यामुळेच पंजाब किंग्स ( PBKS) आजच्या सामन्यात सावधतेनं उतरेल. हैदराबादविरुद्ध १७ पैकी ५ सामन्यांतच पंजाबला विजय मिळवता आला आहे, तर १२ पराभव पत्करावे लागले आहेत. पंजाबला प्ले ऑफच्या शर्यतीत राहायचे असेल तर त्यांना उर्वरित पाचही सामने जिंकावे लागतील. आता ते ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत.

IPL 2021, DC vs RR : दिल्ली-राजस्थान सामन्यात घडली कॉमेडी; सर्व पब्लिक हसू लागली, Video 


या सामन्यात पंजाबनं विक्रमवीर ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन एलिस याला खेळवले. बांगलादेशविरुद्धच्या पदार्पणाच्या ट्वेंटी-२० सामन्यात हॅटट्रिक घेतली होती.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पदार्पणात अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिलाच गोलंदाज ठरला. एलिसनं २०व्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर महमुदुल्लाह, मुस्ताफिजूर रहमान व महेदी हसन यांना बाद केले अन् विक्रम नोंदवला. ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-२० हॅटट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी ब्रेट ली ( वि. बांगलादेश, २००७) आणि अॅश्टन अॅगर ( वि. द. आफ्रिका, २०२०) यांनी अशी कामगिरी केली आहे.  

IPL 2021, DC vs RR Match Highlights: संजू सॅमसन यानंही चूक मान्य केली, म्हणून दिल्लीनं बाजी मारली


पण, फलंदाजानी निराश केले. लोकेश राहुल व मयांक अग्रवाल पुन्हा एकदा पंजाबला स्फोटक सुरुवात करून देतील अशी अपेक्षा होती. मात्र, जेसन होल्डरनं दोघांनाही माघारी पाठवलं. पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लोकेश ( २१) बाद झाला, तर पाचव्या चेंडूवर मयांक ( ५) माघारी परतला. ख्रिस गेलकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु तोही राशिद खानच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला अन् १४ धावांवर तंबूत परतला. निकोलस पूरनचा ( ८) अपयशाचा पाढा कायम राहिला अन् अब्दुल समदनं त्याची विकेट घेतली. एडन मार्कराम ( २७) याला संदीप शर्मानं स्वतःच्याच गोलंदाजीवर अफलातून झेल घेत माघारी पाठवून पंजाबची अवस्था ५ बाद ८८ अशी केली.

आर अश्विननं विक्रमाची नोंद करताच रिषभ पंतचे 'ते' ट्विट होतंय व्हायरल; काय लिहिलं होतं त्यात?


१६व्या षटकात कर्णधार केन विलियम्सननं पुन्हा होल्डरला पाचारण केलं अन् त्यानं दीपक हुडाची विकेट मिळवून दिली. बदली खेळाडू जे सुचिथनं अफलातून झेल टिपला. त्यानंतर पंजाब किंग्सला डोकं वर काढणं अवघड गेलं अन् त्यांनी कशाबशा ७ बाद १२५ धावा करता आल्या. होल्डरनं १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. २७ धावा करणारा मार्कराम हा पंजाबकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

Web Title: IPL 2021, SRH vs PBKS Live Updates: : Punjab Kings 125/7 (20 overs) against SunRisers Hyderabad; jason Holder (3/19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app