Join us

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्समध्ये राडा; दोन प्रमुख फलंदाजांमध्ये जुंपली कुस्ती, पाहा...

IPL 2021, Delhi Capitals: दिल्लीने एक अनोखा व्हिडिओ पोस्ट करुन संघातील फलंदाज कसे एकमेकांविरुद्ध वागत आहेत हे दाखवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 14:48 IST

Open in App

मुंबई : गतउपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या आयपीएलमध्ये दिमाखदार सुरुवात करताना आपल्या पहिल्या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जला सहजपणे लोळवले. यावेळी, पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या सलामीवीरांनी दिलेला आक्रमक अर्धशतकी तडाखा दिल्लीच्या विजयात महत्त्वाचे ठरले. मात्र, आता याच दोन फलंदाजांमध्ये चांगलीच जुंपली असून या लढाईचा एक व्हिडिओ दिल्ली संघाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

दिल्लीकर गुरुवारी आपला दुसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबईत खेळतील. याही सामन्यात दिल्लीला आपल्या फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. मात्र, त्याआधी दिल्लीने एक अनोखा व्हिडिओ पोस्ट करुन संघातील फलंदाज कसे एकमेकांविरुद्ध वागत आहेत हे दाखवले. दिल्लीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ आणि शिखर धवन एकमेकांविरुद्ध कुस्ती खेळतानाचे दिसत असून त्यांच्यासोबत असलेल्या मेश यादवला मात्र याचा काहीच फरक पडत नसल्याचेही दिसले.

निमित्त होते ते एका शूटचे. या शूटनिमित्त धवन, पृथ्वी आणि उमेश सज्ज होत असतानाच पृथ्वीने खोडी काढली ती गब्बरची. याआधीही अनेकदा धवन आणि पृथ्वी यांच्यातील मस्ती क्रिकेटप्रेमींनी पाहिली आहे. हीच मस्ती आता पुन्हा पाहण्यास मिळाली आहे.    

शूटसाठी धवन सज्ज होत असतानाच त्याच्या मागे उभ्या असलेल्या पृथ्वीने धवनला छेडले. यामुळे धवननेही लागलीच पृथ्वीला धरले आणि दोघांमध्ये जणू कुस्तीचा डाव रंगला. हा मजेशीर व्हिडिओ पोस्ट करताना दिल्लीने म्हटले की, ‘काय वाटतंय तुम्हाला, ही कुस्तीची लढत कोण जिंकणार?’

या व्हिडिओवर अनेकांनी लाईक्स केले असून धवन आणि पृथ्वीला चिअर केले. त्याचवेळी, अनेकांनी उमेश यादवचेही कौतुक केले, कारण या दोघांच्या लढाईकडे, त्याने काहीच महत्त्व न देता सरळ दुर्लक्ष केले आहे.  

टॅग्स :दिल्ली कॅपिटल्सआयपीएल २०२१शिखर धवनपृथ्वी शॉ