Join us  

IPL 2021 : लोकेश राहुल हॉस्पिटलमध्ये अन् मैदानावरून बसला त्याला दुसरा धक्का

पंजाब किंग्स ( Punjab Kings) चा नियमित कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याला आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 10:14 PM

Open in App

पंजाब किंग्स ( Punjab Kings) चा नियमित कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याला आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या ( Delhi Capitals) सामन्याला त्याला मुकावे लागले आहे. त्याच्या अनुपस्थितीत मयांक अग्रवालनं PBKSचे नेतृत्व सांभाळले अन् नाबाद ९९ धावांची खेळी करून ६ बाद १६६ धावांची मजल मारून दिली. लोकेशला आजच्या सामन्यात आणखी एक धक्का बसला आहे. पंजाब किंग्सचा नवा कर्णधार सुसाट खेळला, दिल्लीच्या गोलंदाजांना एकटा भिडला अन्... 

मयांक ५८ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ९९ धावांवर नाबाद राहिला. पंजाबनं २० षटकांत ६ बाद १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पृथ्वी शॉ व शिखर धवन या फॉर्मात असलेल्या जोडीची बॅट तळपली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ६३ धावा जोडल्या. पण, सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हरप्रीत ब्रारनं DCला पहिला धक्का दिला. पृथ्वी २२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३९ धावा केल्या. शिखर धवननं आजच्या सामन्यात २४ धावांचा पल्ला पार करून लोकेश राहुलला हा धक्का दिला.   जबरदस्त, जबराट... १४४kmphच्या वेगानं टाकलेल्या चेंडूनं ख्रिस गेलचा उडवला त्रिफळा, Video

लोकेश यंदाच्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर होता. त्यान ७ सामन्यांत ३३१ धावा केल्या आहेत आणि त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ९१ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. पण, आता शिखरन ऑरेंज कॅप शर्यतीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच्या नावावर ८ सामन्यांत ३३५* धावा झाल्या आहेत.  एकाच वेळी दोघं Run Out; पंजाबच्या फलंदाजांचा गोंधळ पाहून आवरणार नाही हसू, Video

लोकेश राहुलला नेमकं काय झालं?''काल रात्री लोकेश राहुलच्या ओटीपोटात दुखू लागलं आणि प्राथमिक उपचारानंतरही त्याला बरं न वाटू लागल्यानं पुढील चाचणी साठी आप्तकालीन रुममध्ये नेण्यात आले. तेथे त्याला अपेंडिसिटिसचा त्रास असल्याचे समोर आले आहे. शस्त्रक्रीया करून तो बरा होऊ शकतो. त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे,'' असे पंजाब किंग्सनं पोस्ट केलं आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१लोकेश राहुलशिखर धवनपंजाब किंग्सदिल्ली कॅपिटल्स