IPL 2021 : PBKS vs DC T20 Live : पंजाब किंग्सचा नवा कर्णधार सुसाट खेळला, दिल्लीच्या गोलंदाजांना एकटा भिडला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 09:10 PM2021-05-02T21:10:18+5:302021-05-02T21:13:10+5:30

ipl 2021 t20 PBKS vs DC live match score updates Ahmedabad : मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) त्याच्यावर सोपवलेली कर्णधाराची जबाबदारी चोख पार पाडली.

IPL 2021 : PBKS vs DC  T20 Live Score Update : Mayank Agarwal scores a brilliant 99 unbeaten on captaincy debut to take Punjab Kings to 166   | IPL 2021 : PBKS vs DC T20 Live : पंजाब किंग्सचा नवा कर्णधार सुसाट खेळला, दिल्लीच्या गोलंदाजांना एकटा भिडला अन्... 

IPL 2021 : PBKS vs DC T20 Live : पंजाब किंग्सचा नवा कर्णधार सुसाट खेळला, दिल्लीच्या गोलंदाजांना एकटा भिडला अन्... 

Next

ipl 2021 t20 PBKS vs DC live match score updates Ahmedabad : मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) त्याच्यावर सोपवलेली कर्णधाराची जबाबदारी चोख पार पाडली. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत पंजाब किंग्सनं ( Punjab Kings) मयांकच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली. त्यानं प्रचंड दबावात संयमानं खेळ करताना अर्धशतक झळकावले, शिवाय संघालाही समाधानकारक पल्ला गाठून दिला. दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals)  गोलंदाजांची कामगिरी आज सुरेख झाली, त्यात पंजाबच्या फलंदाजांच्या चुकाही DCच्या पथ्यावर पडल्या. IPL 2021 : PBKS vs DC T20 Live Score Update

प्रभसिमरन सिंग आणि मयांक अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली, परंतु सलग दुसऱ्या सामन्यात प्रभसिमरन सिंगला ( १२) अपयश आलं. कागिसो रबाडानं त्याचा बाद केले. त्यानंतर सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ख्रिस गेलनं खणखणीत षटकार मारून रबाडाचं स्वागत केलं. पण, पुढच्याच चेंडूवर रबाडानं त्याला चालतं केलं. रबाडानं १४४च्या वेगान टाकलेल्या फुलटॉस चेंडू गेलला खेळताच आला नाही अन् त्याचे दोन त्रिफळे उडाले..(  जबरदस्त, जबराट... १४४kmphच्या वेगानं टाकलेल्या चेंडूनं ख्रिस गेलचा उडवला त्रिफळा, Video ) .PBKS vs DC, PBKS vs DC live score, IPL 2021, IPL 2021 latest news

पदार्पण करणाऱ्या डेवीड मलाननं आज कर्णधार मयांकसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना पंजाबचा डाव सावरला. पण, दिल्लीच्या गोलंदाजांना पंजाबच्या धावगतीला वेसण घातले होते. १४व्या षटकात विचित्र प्रकार पाहायला मिळाला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मयांक अग्रवालनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू टोलावला. मयांकला एक धाव घ्यायची होती, परंतु दीपक हुडा त्यासाठी तयार नव्हता. या सर्व गोंधळात दोन्ही फलंदाज एकाच दिशेला धावले अन् दोघंही धावबाद झाले, पण तिसऱ्या पंचांनी दीपक हुडाला धावबाद दिले. (  एकाच वेळी दोघं Run Out; पंजाबच्या फलंदाजांचा गोंधळ पाहून आवरणार नाही हसू, Video)  मयांकनं अखेरपर्यंत खिंड लढवताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.PBKS vs DC IPL Matches, PBKS vs DC IPL match 2021, PBKS vs DC T20 Match,PBKS vs DC Live Score

मयांक ५८ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ९९ धावांवर नाबाद राहिला. पंजाबनं २० षटकांत ६ बाद १६६ धावा केल्या. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 : PBKS vs DC  T20 Live Score Update : Mayank Agarwal scores a brilliant 99 unbeaten on captaincy debut to take Punjab Kings to 166  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app