Join us

IPL 2021: 'आज भाजी नाही, पोहे बनवू'; धवन-पृथ्वी शॉ जोडी काय करेल सांगता येत नाही, हा धमाल VIDEO पाहा...

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ एकत्र आले की काही सांगायलाच नको. ही जोडी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दोघांच्या धमाल व्हिडिओंची जोरदार चर्चा होते. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 19:32 IST

Open in App

IPL 2021: आयपीएल म्हटलं की धमाल, मनोरंजन अन् थरार हे गणित ठरलेलं असतं. ज्यापद्धतीनं खेळाडू मैदानात थरारक सामन्यांची अनुभती देत असतात त्याच पद्धतीनं खेळाडू मैदानाबाहेर म्हणजेच ड्रेसिंग रुम, सराव आणि फावल्या वेळेत धमाल मस्ती करत असतात. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. त्यात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ एकत्र आले की काही सांगायलाच नको. ही जोडी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दोघांच्या धमाल व्हिडिओंची जोरदार चर्चा होते. 

शिखर आणि शॉ जोडीनं आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ शूट केला असून यात दोघं 'फूल टू नौटंकी' करताना दिसत आहेत. या व्हिडिओत पृथ्वी शॉ पत्नीच्या भूमिकेत आहे तर धवन शॉला आज भाजी नको, पोहे बनवू असं सांगत धमाल करताना दिसत आहे. धवन-शॉची जोडी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना मैदानात चौकार आणि षटकारांची आतषबाजी करताना पाहायला मिळते. दोघांमध्ये मैदानात ज्यापद्धतीनं समन्वय पाहायला मिळतो. तसंच दोघं मैदानाबाहेरही धमाल करत असतात. 

टॅग्स :आयपीएल २०२१शिखर धवनपृथ्वी शॉदिल्ली कॅपिटल्स
Open in App