Join us  

IPL 2021: ऋतूराजमध्ये CSKचा कर्णधार होण्याची पूर्ण क्षमता; वीरेंद सेहवागचं मोठं विधान!

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा सलामीवीर युवा फलंदाज ऋतूराज गायकवाड दमदार फलंदाजी करताना पाहायला मिळतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 3:22 PM

Open in App

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा सलामीवीर युवा फलंदाज ऋतूराज गायकवाड दमदार फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ऋतूराजनं गेल्या तीन सामन्यांमध्ये अनुक्रमे ६४, ३३ आणि ७५ अशी जबरदस्त खेळी साकारली आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ऋतूराजची नजाकती फटक्यांची आतषबाजी पाहून भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग भलताच खूश झाला आहे. (IPL 2021: Ruturaj Gaikwad has the capability to become the CSK captain says Virender Sehwag)

IPL 2021: "धोनी पुढल्या वर्षी खेळला नाही तर 'त्या' दुसऱ्या 'कॅप्टन कूल'ला करा CSKचा कर्णधार"

ऋतूराजसोबत अद्याप वैयक्तीक भेट होऊ शकली नसली तरी येत्या काही वर्षांनी तो चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं नेतृत्व करू शकतो असा ठाम विश्वास वाटतो, असं महत्वपूर्ण विधान वीरेंद्र सेहवाग यानं केलं आहे. ऋतूराजनं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात केलेल्या फलंदाजीचं सेहवागनं तोंडभरुन कौतुक केलं. संयमी आणि शांतपणे ऋतूराज खेळतो. याशिवाय, त्याला कोणत्याक्षणी धोका पत्करून खेळायचं हे देखील चांगलं कळतं, असं सेहवागनं म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हणाला सेहवाग?"मी ऋतूराजला आतापर्यंत कधीच भेटलेलो नाही किंवा त्याला स्थानिक सामन्यांमधली त्याची कामगिरीही पाहिलेली नाही. पण सीएसकेच्या संघात तो यापुढची काही वर्ष राहिला तर तो संघाचा कर्णधार होऊ शकतो. त्याच्या फलंदाजीत संयम आणि शांतपणा तर आहेच. पण कोणत्याक्षणी आक्रमक व्हायचं याचीही कला त्याला अवगत आहे", असं सेहवाग म्हणाला. 

IPL 2021: गेल्या वर्षी CSKचं नेमकं काय चुकलं?, महेंद्रसिंग धोनीनं अगदी सोप्या शब्दात सांगितलं...

"ऋतूराज जबाबदारीपासून पळ काढताना दिसत नाही आणि गरज नसताना विकेटही टाकत नाही. त्याच्यातील सर्व गुणवत्ता पाहता त्याला सीएसकेनं संघात कायम ठेवायला हवं. कारण त्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे. त्यानं जर स्थानिक क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवलं असेल तर तो नक्कीच येत्या काळात सीएसकेसाठी देखील ही कामगिरी करू शकतो", असंही सेहवागनं म्हटलं. 

ऋतूराजनं सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना गाजवलासनरायझर्स हैदराबादच्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपरकिंग्जकडून सलामीवीर ऋतूराज गायकवाड यानं तुफान खेळी साकारली. त्यानं ४४ चेंडूत १२ खणखणीत चौकारांसह ७५ धावा कुटल्या. तर फॅफ डू प्लेसिस यानं ३८ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ५६ धावा केल्या. फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी हैदराबादच्या गोलंदाजांची पिसे उपटली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना चेन्नईची विजयाच्या दिशेनं जोरदार आगेकूच करून दिली. या दोघांनी सलग तिसऱ्या सामन्यात ५०+ धावांची भागीदारी केली.  

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीविरेंद्र सेहवाग