Join us  

IPL 2021 : RR vs SRH T20 Live : जॉस दी बॉस!, इंग्लंडच्या फलंदाजानं SRHच्या गोलंदाजांना उभ, आडवं सोललं; ११ चौकार व ८ षटकारांनी दणाणून सोडलं

ipl 2021 t20 RR vs SRH live match score updates Delhi : सहा सामन्यांत फक्त एक विजय मिळवणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला आज राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) जॉस बटलरनं ( Jos Buttler) यानं धु धु धुतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 5:13 PM

Open in App

ipl 2021 t20 RR vs SRH live match score updates Delhi : सहा सामन्यांत फक्त एक विजय मिळवणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला आज राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) जॉस बटलरनं ( Jos Buttler) यानं धु धु धुतले. बटलरनं आयपीएलमध्ये पहिल्या शतकाची नोंद करताना कर्णधार संजू सॅमसनसह दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. इंग्लंडच्या खेळाडूची आयपीएलमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. IPL 2021 :RR vs SRH T20 Live Score Update

नाणेफेक जिंकून SRH नं राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिलं. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली यंदाच्या पर्वातील या पहिल्याच सामन्यात SRHच्या डावपेचातही बदल पाहायला मिळाले. विलियम्सननं सुरूवातीच्या षटकांत आदिल राशिदला गोलंदाजीसाठी आणले आणि त्यानं त्याच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालला ( १२) पायचीत केलं. त्यानंतर आलेल्या कर्णधार संजू सॅमसन व जॉस बटलर या जोडीनं SRHला रडवले. राशिदची षटकं आधीच संपवल्यानं अखेरची षटकं कोण टाकणार असा प्रश्न केनला पडलेला दिसला.IPL 2021 latest news, RR vs SRH IPL Matches  नेतृत्व गेलं अन् संघातील स्थानही; डेव्हिड वॉर्नरच्या चाहत्यांनी SRHला घेतलं फैलावर 

सॅमसन व बटलर जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मोहम्मद नबीला १५व्या षटकात गोलंदाजीला आणले अन् बटलरन त्या षटकात दोन चौकार व दोन षटकारासह २१ धावा चोपल्या. आज नशिबाची साथही राजस्थान रॉयल्सच्या बाजूनं होती. SRHच्या गोलंदाजांची सुमार कामगिरी, त्यात झेल सोडण्याची चूक व धावबाद करण्याच्या गमावलेल्या संधीमुळे RRचा फायदा झाला. १७व्या षटकात अखेर जोडी तुटली. विजय शंकरच्या चेंडूवर उत्तुंग फटका संजू सॅमसननं मारला, परंतु अब्दुल समदनं सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. संजूनं ३३ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ४८ धावांसह दुसऱ्या विकेटसाठी बटलरसह १५० धावांची भागीदारी केली. IPL 2021 RR vs SRH, RR vs SRH Live Match

बटलरनं ५६ चेंडूंत शतक पूर्ण केलं आणि त्यात १० चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. बटलरचा झंझावात १९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर दुर्दैवीरित्या थांबला. त्यानं ६४ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांसह १२४ धावांची वादळी खेळी केली.  राजस्थाननं २० षटकांत ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा केला. 

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सजोस बटलरसनरायझर्स हैदराबाद