IPL 2021 : RR vs SRH T20 Live : नेतृत्व गेलं अन् संघातील स्थानही; डेव्हिड वॉर्नरच्या चाहत्यांनी SRHला घेतलं फैलावर 

आम्ही कठोर निर्णय घेतला. आजच्या सामन्यात कोणाला तरी मुकावे लागत आहे आणि दुर्दैवानं तो वॉर्नर आहे- टॉम मूडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 04:31 PM2021-05-02T16:31:41+5:302021-05-02T16:32:08+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 :RR vs SRH : Tom Moody reveals David Warner's reaction to SRH captaincy snub, social media react on team decision | IPL 2021 : RR vs SRH T20 Live : नेतृत्व गेलं अन् संघातील स्थानही; डेव्हिड वॉर्नरच्या चाहत्यांनी SRHला घेतलं फैलावर 

IPL 2021 : RR vs SRH T20 Live : नेतृत्व गेलं अन् संघातील स्थानही; डेव्हिड वॉर्नरच्या चाहत्यांनी SRHला घेतलं फैलावर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021 t20 RR vs SRH live match score updates Delhi : सहा सामन्यांत फक्त एक विजय मिळवणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं IPL 2021च्या मध्यंतराला नेतृत्वबदल केला. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली SRHचा संघ प्रथमच मैदानावर आज उतरला आहे आणि त्यांच्यासमोर राजस्थान रॉयस्लचे ( Rajasthan Royals) आव्हान आहे. SRHनं डेव्हिड वॉर्नरकडून ( David Warner) नेतृत्व काढून घेतलेच, शिवाय त्याला आजच्या सामन्यात बाकावर बसवण्याचाही निर्णय घेतला. ( David Warner won't be playing today) त्यामुळे चाहते प्रचंड खवळले आहेत.  

या लढतीपूर्वी SRHचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी सांगितले की,''आम्ही कठोर निर्णय घेतला. आजच्या सामन्यात कोणाला तरी मुकावे लागत आहे आणि दुर्दैवानं तो वॉर्नर आहे. त्यालाही धक्का बसला आणि तो निराश आहे. त्याच्याजागी दुसरं कुणीही असतं तर तोही निराश झाला असता.'' 

डेव्हीड वॉर्नरची कामगिरी

  • परदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक ५४४७ धावा
  •  २०१५, २०१७ व २०१९ अशी तीन ऑरेंज कॅप नावावर असलेला एकमेव फलंदाज
  • आयपीएलच्या सहा पर्वांत ५००+ धावा करणारा फलंदाज   
  • आयपीएलमध्ये ३०००+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वोत्तम ४२.२२ची सरासरी  






 

Web Title: IPL 2021 :RR vs SRH : Tom Moody reveals David Warner's reaction to SRH captaincy snub, social media react on team decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.