Join us  

IPL 2021 : RR vs PBKS T20: संजू सॅमसननं टॉसनंतर 'COIN' खिशात टाकला; मॅच रेफरी अन् लोकेश राहुल पाहातच राहीले!

IPL 2021 : RR vs PBKS T20: कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) यानं सोमवारी अविस्मरणीय खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 7:20 AM

Open in App

IPL 2021 : RR vs PBKS T20: कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) यानं सोमवारी अविस्मरणीय खेळी केली. त्यानं ६३ चेंडूंत १२ चौकार व ७ षटकारांसह ११९ धावा केल्या आणि कर्णधारपदाच्या पदार्पणात शतक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. या सामन्यापूर्वी नाणेफेकीला आलेल्या संजूनं नाणेफेकीचा कॉईन आपल्या खिशात टाकला. संजूची ही कृती लोकेश राहुल व मॅच रेफरी पाहतच राहिले. याबाबत जेव्हा संजूला विचारले, तेव्हा तो म्हणाला, तो कॉईन चांगला दिसत होता आणि मी तो खिशात घातला. मी तो आपल्याकडे ठेऊ शकतो का, असे मॅच रेफरीला विचारले, पण त्यांनी नकार दिला.

लोकेश राहुल ( ९१) व दीपक हुडा ( ६४) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सनं ६ बाद २२१ धावांचा डोंगर उभा केला. पण, राजस्थान रॉयल्सचा सलामीवर बेन स्टोक्स शून्यावर माघारी परतला. जोस बटलर, शिवम दुबे आणि रियान पराग यांच्यासह संजूनं अनुक्रमे ४५ ( २६ चेंडू), ५३ ( ३३ चेंडू) आणि ५२ (२३ चेंडू) अशी भागीदारी केली. १२ व ३५ धावांवर असताना संजूला जीवदान मिळाले होते. संजू सॅमसननं आयपीएलमधील तिसरे शतक पूर्ण केले. पण, त्याचे हे शतक व्यर्थ ठरले आणि राजस्थानला ७ बाद २१७ धावांपर्यंत मजल मारता आली.  

टॅग्स :आयपीएल २०२१संजू सॅमसनराजस्थान रॉयल्सलोकेश राहुलपंजाब किंग्स