Join us  

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : संजू सॅमसनचे IPLमधील तिसरे शतक, कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात विक्रम 

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) २२१ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, प्रथमच कर्णधाराच्या भूमिकेत असलेल्या संजू सॅमसननं ( Sanju Samson) तुफान खेळ केला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 11:24 PM

Open in App

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) २२१ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, प्रथमच कर्णधाराच्या भूमिकेत असलेल्या संजू सॅमसननं ( Sanju Samson) तुफान खेळ करताना PKBSच्या मनातील धाकधुक कायम राखली. जोस बटलर व शिवम दुबे यांच्यासोबत संजूनं RRच्या डावाला आकार दिला. रियान परागसह त्यानं १९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. संजू सॅमसननं आयपीएलमधील तिसरे शतक पूर्ण केले. त्यानं ५४ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह हे शतक पूर्ण केलं. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. Sanju Samson becomes the first player to score a century on captaincy debut in IPL history.

बेन स्टोक्सचा भोपळा अन् संजू सॅमसननं डाव सावरला...२२२ धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) अपेक्षित सुरुवात करता आली नाही. मोहम्मद शमीनं टाकलेल्या पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बेन स्टोक्स ( Ben Stokes) यानं मारलेला फटका जागच्या जागी उंच उडाला. तो चेंडू झेलण्यासाठी यष्टिरक्षक लोकेश राहुल, शमी आणि आणखी एक खेळाडू धावला. झेल तू घेतोस की मी, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, शमीनं तो टिपला अन् स्टोक्सन शून्यावर माघारी परतला. कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) डाव सावरण्यासाठी प्रयत्न करताना दिसला. जोस बटलरसह त्यानं ४५ धावा जोडल्या. राजस्थाननं पहिल्या १० षटकांत ३ बाद ९५ धावा केल्या. संजूनं ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. शिवम दुबेची त्याला साथ मिळाली आणि चौथ्या विकेटसाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण, अर्षदीप सिंगनं ही जोडी तोडली, दुबे २३ धावांवर माघारी परतला. IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update

२४ चेंडूंत ४८ धावा अन् शमीनं सामन्यात आणली चुरससंजू सॅमसन व रियान पराग यांनी पाचव्या विकेटसाठी २३ चेंडूंत ५२ धावांची भागीदारी करून पंजाबचं टेंशन वाढवलं होतं. RRला विजयासाठी अखेरच्या चार षटकांत ४८ धावांची गरज असताना लोकेश राहुलनं संघातील अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला पाचारण केलं. त्यानं तिसऱ्या चेंडूवर ही जोडी तोडली. पराग ११ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २५ धावा केल्या. संजू सॅमसनचा संघर्ष अखेरपर्यंत दिसला. 

१३ षटकार अन् १८ चौकारांची आतषबाजी...दीपक हुडा ( Deepak Hooda), लोकेश राहुल ( KL Rahul) आणि ख्रिस गेल ( Chris Gayle) या त्रिकुटानं राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. दीपक हुडा व लोकेश राहुल या जोडीनं ४७ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी करताना पंजाब किंग्सला ( Punjab Kings) दोनशेपार धावा करून दिल्या. लोकेश राहुल ५० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह  ९१ धावांवर माघारी परतला. RRच्या चेतन सकारियानं ३१ धावांत ३ विकेट्स अन् एक अफलातून झेल घेत आपली छाप सोडली. लोकेश राहुलला दोन जीवदान मिळाले आणि त्याचाच फटका RRला बसला. ipl 2021  t20 RR vs PBKS live match score updates Mumbai

ख्रिस गेलचा ३५०वा षटकार...४१ वर्षीय ख्रिस गेलनं आजच्या सामन्यात ३५०वा षटकार खेचून आयपीएलमध्ये मोठा विक्रम नावावर केला. २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावा करणाऱ्या गेलचा झेल बेन स्टोक्सनं टिपला.  दीपक हुडानं  २८ चेंडूंत ६४ धावा कुटल्या. त्यापैकी ५२ धावा या केवळ चौकार व षटकारानं आल्या ( ४ चौकार व ६ षटकार). पंजाब किंग्सनं २० षटकांत ६ बाद २२१ धावांचा डोंगर उभा केला. IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update 

टॅग्स :आयपीएल २०२१संजू सॅमसनराजस्थान रॉयल्सपंजाब किंग्स