Join us

IPL 2021, Fabian Allen: जस्ट फॅब्युलस! पंजाबच्या 'फॅबियन'नं सीमा रेषेजवळ टिपलेला अफलातून झेल एकदा पाहाच...

IPL 2021, Fabian Allen: पंजाबच्या फॅबियन अॅलननं सीमा रेषेजवळ अतिशय नितांत सुंदर झेल टिपला आणि क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 20:55 IST

Open in App

IPL 2021, Fabian Allen: आयपीएलच्या १४ व्या पर्वाचा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू असून आज दुबईच्या स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत सुरू आहे. आयपीएल म्हटलं अफलातून फटकेबाजी आणि तितक्याच अविश्वसनीय क्षेत्ररक्षणाचे क्षण अनुभवायला मिळतात. आजच्या सामन्यात पंजाबच्या फॅबियन अॅलननं सीमा रेषेजवळ अतिशय नितांत सुंदर झेल टिपला आणि क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं आहे. 

राजस्थान रॉयल्सचे फलंदाज आज दमदार फलंदाजी करत असून पंजाबची गोलंदाजी निष्प्रभ ठरताना दिसत आहे. लियाम लिव्हिंगस्टोन टी-२० क्रिकेटमध्ये सध्या दमदार फॉर्मात आहे आणि हाच फॉर्म आयपीएलमध्ये कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता. तशी धडाकेबाज फलंदाजी देखील त्याच्याकडून आज पाहायला मिळत होती. सामन्याच्या १२ व्या षटकात अर्शदिपच्या गोलंदाजीवर लियाम लिव्हिंगस्टोननं तब्बल ९७ मीटर उंच खणखणीत षटकार हाणला होता. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेपार टोलवण्यासाठी लिव्हिंगस्टोननं प्रयत्न केला. पण सीमारेषेवर पंजाबच्या फॅबियन अॅलननं वायुवेगानं झेप घेत अफलातून झेल टिपला आणि घातक लिव्हिंगस्टोनला तंबूचा रस्ता दाखवला. 

 

टॅग्स :आयपीएल २०२१पंजाब किंग्सराजस्थान रॉयल्स
Open in App