Join us  

IPL 2021 : RCBच्या अडचणीत आणखी भर, देवदत्त पडिक्कलनंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( Royal Challengers Bangalore) सलामीवीर देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal) कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 10:27 AM

Open in App

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( Royal Challengers Bangalore) सलामीवीर देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal) कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ( Mumbai Indians) पहिल्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. एक बाजू सावरत असल्याचे दिसताच RCBच्या ताफ्यातील आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू डॅनिएल सॅम्स ( Daniel Sams) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तो आता आयसोलेशन मध्ये आहे. २९ सदस्यांना कोरोनाची लागण, तरीही मुंबईतील सामने हलवण्यास BCCI तयार नाही; 'ही' आहेत तीन कारणं!

RCBनं ट्विट केलं की,''३ एप्रिलला डॅनिएल सॅम्स चेन्नईच्या हॉटेलमध्ये आला तेव्हा त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. ७ दुसऱ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट ७ एप्रिलला हाती आला आणि तो पॉझिटिव्ह आढळला. त्याच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत आणि त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले गेले आहे. RCBची वैद्यकिय टीम त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे.''  RCBचा फलंदाज फुल्ल फॉर्मात; ४९ चेंडूंत कुटल्या १०४ धावा, विराट कोहलीच्या संघाची मधली फळी मजबूत होणार डॅनिएल सॅम्सनं ५४ ट्वेंटी-२० सामन्यांत ४८५ धावा आणि ६७ विकेट्स घेतल्या आहेत. 

किरण मोरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

मोरे यांच्यात कोणतीही लक्षण दिसत नाहीत आणि ते आयसोलेटेड झाले आहेत. मुंबई इंडियन्स आणि किरण मोरे यांनी बीसीसीआयच्या सर्व नियमांचं पालन केलं आहे. मुंबई इंडियन्सची वैद्यकिय टीम मोरे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे आणि बीसीसीआयच्या सूचनांचं पालन करत आहे. आम्ही चाहत्यांना हेच सांगतो की कोरोना संदर्भातील नियमांचं पालन करा व स्वतःला सुरक्षित ठेवा. 

२९ सदस्यांना कोरोनाची लागण, तरीही मुंबईतील सामने हलवण्यास BCCI तयार नाही

मुंबईतील आयपीएल संदर्भातील २९ सदस्य आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. त्यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळेच राज्य सरकारनं काही कडक निर्बंध जाहीर केली आहेत. अशात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यानं मुंबईतील सामने हैदराबादला खेळवा, असा प्रस्ताव BCCIसमोर ठेवला. तरीही BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) ने सामने वेळापत्रकानुसारच होतील, हे स्पष्ट केले. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ( Royal Challengers Bangalore Plyers List ) :  

विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, फिन अॅलन, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, कायले जेमिन्सन, डॅनिएल ख्रिस्टियन, के एस भारत, सूयश प्रभुदेसाई . 

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआॅस्ट्रेलिया