Join us

IPL 2021: रियान पराग जेव्हा वीरेंद सेहवागची नक्कल करतो..., पाहा भन्नाट Video

IPL 2021: आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा युवा खेळाडू रियान पराग (Riyan Parag) यानं त्याच्या हटके स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 17:00 IST

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा युवा खेळाडू रियान पराग (Riyan Parag) यानं त्याच्या हटके स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मग ते भर मैदानात त्यानं केलेलं पारंपारिक बिहू नृत्य असो किंवा मग सीमारेषेवर झेल टीपल्यानंतर राहुल तेवतियासोबत केलेला सेल्फी डान्स. रियान पराग त्याच्या अनोख्या सेलिब्रेशनसाठी ओळखू जावू लागला आहे. (IPL 2021: Riyan Parag perfectly mimics Virender Sehwag’s expressions while batting)

रियान पराग जितका मैदानात मनोरंजन करत असतो तितकाच तो ड्रेसिंग रुममध्येही सक्रीय असतो. नुकतंच त्याचा एक व्हिडिओ राजस्थान रॉयल्सनं शेअर केला आहे. यात रियान परागनं भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याची नक्कल केली आहे. 

राजस्थान रॉयल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये एक खेळ घेण्यात आला. यात रियान पराग याला त्याच्यातील अभिनयाचे कलागुण दाखवायचे होते आणि फिरकीपटू श्रेयस गोपाल याला खेळाडूचं नाव ओळखायचं होतं. रियान पराग याला वीरेंद्र सेहवाग याचा अभिनय करायचा होता आणि त्यानं तो अगदी बेमालूम पद्धतीनं केला. वीरेंद सेहवाग जेव्हा मैदानात फलंदाजीला उतरायचा आणि ज्या पद्धतीनं तो खेळायचा याची हुबेहुब नक्कल रियान पराग करताना दिसतो. श्रेयस गोपलनंही रियानच्या सुंदर अभियनावरून खेळाडूचं नाव अचूक ओळखलं. 

दरम्यान, आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये रियान पराग त्याच्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी अद्याप करू शकलेला नाही. गेल्या सहा सामन्यांमध्ये त्यानं ६३ धावा केल्या असून केळव एक विकेट घेतली आहे. येत्या सामन्यांमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. रविवारी राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादसोबत होणार आहे. दोन्ही संघांना सामना जिंकणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. कारण दोन्ही संघ गुणतालिकेत तळाला आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्स