Join us

IPL 2021: मोठी बातमी! श्रेयस अय्यर आयपीएलला मुकणार; रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार!

IPL 2021, Rishabh Pant: आयपीएलचा १४ वा मोसम सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्स संघाचा मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 20:44 IST

Open in App

IPL 2021: आयपीएलचा १४ वा मोसम सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्स संघाचा मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या संघाचा हुकमी एक्का आणि कर्णधार श्रेयस अय्यर संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंडमधील वनडे मालिकेत दुखापत झाल्यानं श्रेयस अय्यरला डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. श्रेयसच्या खांद्याचं हाड निखळलं होतं. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत आता दिल्ली कॅपिटल्सची धुरा आता २३ वर्षीय रिषभ पंतच्या खांद्यावर असणार आहे. रिषभनं याआधी २०१७ साली सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत दिल्लीच्या संघाचं नेतृत्व केलं आहे. 

रिषभ पंत तुफान फॉर्मातऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेन कसोटीत रिषभ पंत चमकला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही रिषभ पंतनं दमदार कामगिरीनं स्वत:चं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. इंग्लंडच्या माऱ्यासमोर बिनधास्तपणे खेळण्याच्या रिषभच्या आक्रमक खेळीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाकडूनही रिषभनं अनेक सामन्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. आक्रमक फटकेबाजीनं त्यानं अनेक सामने खेचून आणले आहेत. आता कर्णधारपदाची जबाबदारी दिल्यानंतर रिषभच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. 

 

टॅग्स :रिषभ पंतआयपीएल