IPL 2021, RCB vs DC Live Updates : और ये लगा छक्का!; अखेरच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं मिळवला थरारक विजय

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Updates : प्ले ऑफमध्ये स्थान पक्कं केलेल्या दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातला हा सामना औपचारिकच ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 11:15 PM2021-10-08T23:15:59+5:302021-10-08T23:16:27+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, RCB vs DC Live Updates : KS Bharat is the hero, #RCB need 5 runs in the final ball and he hit a six, RCB win by 7 wickets | IPL 2021, RCB vs DC Live Updates : और ये लगा छक्का!; अखेरच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं मिळवला थरारक विजय

IPL 2021, RCB vs DC Live Updates : और ये लगा छक्का!; अखेरच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं मिळवला थरारक विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Updates : प्ले ऑफमध्ये स्थान पक्कं केलेल्या दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातला हा सामना औपचारिकच ठरला. RCBनं तिसऱ्या स्थानासह एलिमिनेटरमध्ये जागा मिळवली आणि त्यांना कोलकाता नाइट रायडर्सचा ( RCB vs KKR) सामना करावा लागणार आहे. DCचा पराभव झाला असला तरी त्यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे. आता क्वालिफायर १मध्ये त्यांना चेन्नई सुपर किंग्सचा ( Qualifier 1 - DC  vs CSK सामना करावा लागणार आहे. श्रीकर भरतनं अखेरच्या चेंडूवर षटकार मारून RCBला थरारक विजय मिळवून दिला. 

पृथ्वी शॉ  व शिखर धवन यांनी दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या दहा षटकांत ८८ धावा चोपल्या. दिल्लीनं क्वालिफायर १मध्ये आधीच स्थान पक्कं केल्यामुळे आज त्यांचे फलंदाज मनमोकळेपणाने खेळले. पृथ्वीची थंड पडलेली बॅट आज आग ओकताना दिसली. गब्बरही त्याला उत्तम साथ देत होता. ११व्या षटकात पर्पल कॅपचा विजेता हर्षल पटेल यानं RCBला पहिलं यश मिळवून दिलं. धवन ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात पृथ्वी ( ४८ धावा) ला चहलनं चालतं केलं. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर दिल्लीच्या धावसंख्येवर लगाम लागली.  कर्णधार रिषभ पंत ( १०) आज अपयशी ठरला. श्रेयस  अय्यनं खेळपट्टीवर टीकण्यासाठी पुरेसा वेळ घेतला, परंतु तो ( १८) मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. शिमरोन हेटमायरनं २९ धावा करत DC ला ५ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारून दिली. 

विराट कोहली व देवदत्त पडिक्कल RCBचे दोन्ही सलामीवीर ६ धावांवर माघारी परतले. देवदत्तला भोपळाही फोडता आला नाही, तर विराट ४ धावा करू शकला आणि या दोघांना अॅनरिच नॉर्ट्जे यानं बाद केले.  श्रीकर भरत आणि एबी डिव्हिलियर्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. अक्षर पटेलनं ही जोडी तोडताना एबीला २६ धावांवर माघारी परतला. भरतनं ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ग्लेन मॅक्सवेलनं फॉर्म कायम  राखताना भन्नाट फटके मारले. मॅक्सवेल व भरत या जोडीनं १०च्या सरासरीनं धावा कुटल्या. RCBला अखेरच्या १८ चेंडूंत ३१ धावांची गरज असताना १८व्या षटकात त्यांनी १५ धावा केल्या. त्यामुळे सामना १२ चेंडूंत १९ धावा असा झाला. नॉर्ट्जेनं १९व्या षटकात केवळ चार धावा देत सामन्यातील चुरस अधिक वाढवली.


आवेश खाननं टाकलेल्या २०व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर मॅक्सवेलनं ६ धावा करताना वैयक्तिक अर्धशतकासह भरतसह शतकी भागीदारी पूर्ण केली. आवेशनं तिसरा चेंडू यॉर्कर फेकला अन् मॅक्सवेलसाठी LBWची अपील झाली. DCनं त्यासाठी DRS घेतला. मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये २००० धावांचा पल्लाही पार केला. भरत स्ट्राईकवर असताना आवेशनं चौथा चेंडू निर्धाव फेकला आणि आता RCBला २ चेंडूंत ८ धावा करायच्या होत्या. पाचव्या चेंडूवर दोन धावा मिळाल्या, त्यात एक Wide चेंडू फेकला गेला. त्यामुळे १ चेंडू ५ धावा असा सामना आला. अखेरच्या फुलटॉसवर भरतनं षटकार खेचून RCBला ७ विकेट्सनं विजय मिळवून दिला.  भरत ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ७८ धावांवर नाबाद राहिला, तर मॅक्सवेलनं ३३ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. 

Web Title: IPL 2021, RCB vs DC Live Updates : KS Bharat is the hero, #RCB need 5 runs in the final ball and he hit a six, RCB win by 7 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.