Join us  

IPL 2021, RCB vs CSK, Live: Mr. IPL सुरेश रैनाच्या बॅटीतून आला विक्रमी षटकार; विराट कोहली, ख्रिस गेल यांच्या पंक्तित स्थान

ipl 2021  t20 CSK Vs RCB live match score updates Mumbai : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील मुंबईचा टप्पा आज संपत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 4:49 PM

Open in App

ipl 2021  t20 CSK Vs RCB live match score updates Mumbai : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील मुंबईचा टप्पा आज संपत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना होत आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. वानखेडेवर आतापर्यंत नाणेफेक जिंकल्यानंतर बहुतांश कर्णधारांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. पण, धोनीनं घेतलेला हा निर्णय CSKच्या फलंदाजांनी योग्य ठरवला. IPL 2021 : CSK Vs RCB T20 Live Score Update

चेन्नईच्या संघात एक बदल करण्यात आला असून मोईन अली अनफिट असल्यानं त्याच्या जागी ड्वेन ब्राव्होला संधी देण्यात आली आहे, तर इम्रान ताहीरला आज मैदानावर उतरवले आहे. आरसीबीच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत.  आरसीबीनं आज नवदीप सैनीला संधी दिली आहे. तर केन रिचर्डसनच्या जागी डॅनिअल ख्रिश्चनला पुन्हा एकदा संघात दाखल केलं आहे. CSK Vs RCB, CSK Vs RCB live score ZIM vs PAK : विराट कोहलीला धक्का, पाकिस्तानच्या बाबर आजमनं मोडला त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड!

फॉर्मात परतलेल्या ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली या दोघांनी ७४ धावांची भागीदारी केली. ऋतुराज आत्मविश्वासनं कोणतीही घाई न करता नेत्रदिपक फटकेबाजी करत होता. त्यानं युझवेंद्र चहलला सरळ मारलेला उत्तुंग षटकार लाजवाब होता. पण, याच चहलनं त्याला ( ३३) माघारी पाठवले. मोईन अली नसल्यानं सुरेश रैना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्यानंही खणखणीत षटकार खेचून सुरुवात केली. त्यानं या षटकारासह आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण केले.  IPL 2021, IPL 2021 latest news, CSK Vs RCB IPL Matches 'कोरोना संकटातही IPL सुरू, भारताला माझ्या शुभेच्छा'; अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या ट्वीटची चर्चा, नेटिझन्सनी दिलं उत्तर आयपीएलमध्ये २०० षटकार मारणारा तो सातवा फलंदाज ठरला ( Suresh Raina ~ 7th player to smash 200 6s in IPL) ३५४ - ख्रिस गेल२४० - एबी डिव्हिलियर्स२२२ - रोहित शर्मा२१७ - महेंद्रसिंग धोनी २०४ - विराट कोहली२०२ - किरॉन पोलार्ड २०२* - सुरेश रैना  

टॅग्स :आयपीएल २०२१सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर