ZIM vs PAK : विराट कोहलीला धक्का, पाकिस्तानच्या बाबर आजमनं मोडला त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड!

आयसीसीच्या वन डे क्रमवारीत पाकिस्तानच्या बाबर आजमनं ( Babar Azam) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) ची मक्तेदारी संपुष्टात आणली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 04:02 PM2021-04-25T16:02:37+5:302021-04-25T16:07:41+5:30

whatsapp join usJoin us
ZIM vs PAK : Pakistan's star batsman Babar Azam becomes the fastest to 2000 T20I runs, He beat Virat Kohli | ZIM vs PAK : विराट कोहलीला धक्का, पाकिस्तानच्या बाबर आजमनं मोडला त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड!

ZIM vs PAK : विराट कोहलीला धक्का, पाकिस्तानच्या बाबर आजमनं मोडला त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयसीसीच्या वन डे क्रमवारीत पाकिस्तानच्या बाबर आजमनं ( Babar Azam) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) ची मक्तेदारी संपुष्टात आणली. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ पासून अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या विराटला पाकिस्तानी फलंदाजासाठी ती जागा सोडावी लागली. विराट १२५८ दिवस वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. वेस्ट इंडिजचे दिग्गज व्हिव्हियन रिचर्ड्स ( १७४८ दिवस) आणि ऑस्ट्रेलियाचा मायकेल बेवन ( १२५९) यांच्यानंतर विराट सर्वाधिक काळ वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान राहिला होता. या धक्क्यानंतर आजमनं विराटला आणखी एक धक्का दिला.

पाकिस्तानचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे आणि तेथे त्यांना दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत पराभव पत्करावा लागला. आज तिसरा ट्वेंटी-२० सामना सुरू आहे आणि त्यात बाबर आजमनं वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला पाचव्या षटकात पहिला धक्का बसला. शर्जील खान १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार आजम व मोहम्मद रिझवान यांनी शतकी भागीदारी करताना पाकिस्तानला समाधानकारक पल्ला गाठून दिला. या दोघांनी ८९ चेंडूंत १२४ धावा जोडल्या. बाबर ४६ चेंडूंत ५ चौकारांसह ५२ धावा केल्या. रिझवान ६० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ८९ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं २० षटकांत ३ बाद १६३ धावा केल्या.

या सामन्यात बाबरनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वात जलद २००० धावा करणाऱ्या फलंदाजाचा ( Fastest to 2000 T20I runs ) मान पटकावला. हा विक्रम विराटच्या नावावर होता. 
बाबर आजम - ५२ डाव
विराट कोहली - ५६ डाव
अॅरोन फिंच - ६२ डाव 
ब्रेंडन मॅक्युलम - ६६ डाव
मार्टिन गुप्तील - ६८ डाव
पॉल स्टीर्लिंग - ७२ डाव


 

Web Title: ZIM vs PAK : Pakistan's star batsman Babar Azam becomes the fastest to 2000 T20I runs, He beat Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.