IPL 2021, RCB vs CSK, Live: आयपीएलमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघान रॉयल चॅलेंजर्स बंगलोरससमोर विजयासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या रवींद्र जाडेजानं अखेरच्या षटकात तब्बल ५ खणखणीत ठोकून संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली.
IPL 2021: धोनीनं RCB विरोधात उतरवला 'तुरूपचा एक्का', ५३ संघांकडून खेळण्याचा आहे अनुभव!
जडेजानं केवल २८ चेंडूत ५ उत्तुंग षटकार आणि ४ चौकारांच्या साथीनं नाबाद ६२ धावांची खेळी साकारली. तर सलामीवीर ऋतूराज गायकवाड आणि फॅफ डू प्लेसिस यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. ऋतूराजनं ३३ धावांचं योगदान दिलं. तर फॅफ डू प्लेसिसनं ४१ चेंडूत ५० धावांची खेळी साकारली. सुरेश रैना (२४) आणि अंबाती रायुडू (१४) बाद झाल्यानंतर जडेजानं अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी केली. आरसीबीच्या हर्षल पटेलनं टाकलेल्या शेवटच्या षटकात जडेजानं तब्बल ३७ धावा कुटल्या. आयपीएलच्या इतिहासातील अखेरच्या षटकातील ही सर्वोच्च धावसंख्या म्हणून याची नोंद झाली आहे.
IPL 2021, CSK: अनहोनी को होनी कर दे धोनी!, आजच्या निर्णयानं सर्वच बुचकळ्यात, २०१७ नंतर पहिल्यांदाच 'चमत्कार'
दरम्यान, ऋतूराज गायकवाड आणि फॅफ डू प्लेसिस यांनी चेन्नईला चांगली सुरुवात करुन दिली होती. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर सुरेश रैनानं मैदानात जम बसविण्याचा प्रयत्न केला. रैनानं १८ चेंडूत २४ धावा केल्या. तर अंबाती रायुडूनं ७ चेंडूत १४ धावांचं योगदान दिलं. सामन्यात हर्षल पटेल यानं तीन विकेट्स जरी घेतल्या असल्या तरी अखेरच्या षटकात जडेजानं तब्बल ३७ धावा कुटत नवा इतिहास रचला आहे.