Join us  

IPL 2021: ऑस्ट्रेलियाच्या दोन क्रिकेटपटूंची IPLमधून माघार, भारतात वाढत्या कोरोनामुळे घेतला निर्णय?; RCBला धक्का

IPL 2021: आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला (Royal Challengers Bangalore) मोठा धक्का बसला आहे. संघातील ऑस्ट्रेलियाचे दोन मुख्य खेळाडूंनी आयपीएल स्पर्धा अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:08 PM

Open in App

IPL 2021: आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला (Royal Challengers Bangalore) मोठा धक्का बसला आहे. संघातील ऑस्ट्रेलियाचे दोन मुख्य खेळाडूंनी आयपीएल स्पर्धा अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकीपटू अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी आयपीएल स्पर्धा सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक कारणास्तव दोघांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याचं आरसीबीकडून जाहीर करण्यात आलं आहे. पण झम्पा आणि रिचर्डसन यांनी भारतातील वाढत्या कोरोना संकटामुळे माघारी परतण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. (ipl 2021 RCB Adam Zampa and Kane Richardson pull out of IPL due to rising Covid cases in India)

IPL 2021: कोरोना संकट गंभीर, आयपीएल पुढे ढकला; पैसा ऑक्सिजन टँकसाठी वापरा, शोएब अख्तरनं दिला सल्ला

"अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परत जात आहेत. यापुढील सामन्यांसाठी ते उपलब्ध नसतील. रॉयल चॅलेंजर्स बंगोलर संघाचं व्यवस्थापन दोन्ही खेळाडूंच्या निर्णयाचा आदर करत असून त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे", असं ट्विट रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं केलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं यंदाच्या सीझनची सुरुवात दणक्यात केली आहे. सुरुवातीचे चारही सामने जिंकून बंगलोरच्या संघानं गुणतालिक अव्वल स्थान गाठलं होतं. बंगलोरच्या संघाचा गेल्या सामन्यात चेन्नईकडून पराभव झाला होता. पण एकूण पाच सामन्यांमध्ये संघाचा हा पहिलाच पराभव ठरला आहे. आरसीबीकडून गेल्या पाच सामन्यांमध्ये अॅडम झम्पाला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. तर केन रिचर्डसन याला एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. 

भारतात कोरोना रुग्णसंख्येत वाढभारतात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात एकूण ३ लाख ५२ हजार ९९१ नवे कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. तर २८१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीआॅस्ट्रेलियाकोरोना वायरस बातम्या