Join us  

IPL 2021: रवींद्र जडेजानं केली द.आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूची नक्कल, पाहा Video आणि ओळखा पाहू कोण?

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपकिंग्ज (Chennai Super Kings) संघाला सुर गवसलेला पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 3:55 PM

Open in App

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपकिंग्ज (Chennai Super Kings) संघाला सुर गवसलेला पाहायला मिळत आहे. बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धचा सामना १८ धावांनी जिंकून चेन्नईचा संघ आता गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. सीएसकेच्या संघाची यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवात दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पराभवानं झाली होती. पण त्यानंतर पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धचे सामने जिंकून संघानं दमदार कामगिरीची नोंद केली आहे. (IPL 2021 Ravindra Jadeja hilariously imitates Graeme Smith style of batting after KKR vs CSK game)

IPL 2021: धोनीच्या आई-वडिलांना कोरोना; कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीशी केली चर्चा, दिली महत्वाची अपडेट

सीएसकेनं काल कोलकाता विरुद्धचा सामन्यात विजय प्राप्त केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्येही सेलिब्रेशन केलं. चेन्नईचा अष्टपैलू सर रवींद्र जडेजा जसा मैदानात दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय त्याच धमाल पद्धतीनं तो ड्रेसिंग रुममध्येही सहकारी खेळाडूंसोबत मजामस्ती करताना पाहायला मिळतोय. ड्रेसिंग रुममध्ये सहकारी खेळाडूंसोबत धमाल करतानाचा जडेजाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यात जडेजानं दक्षिण आफ्रिकेच्या माजी अष्टपैलूची नक्कल करत सहकारी खेळाडूंना तो खेळाडू कोण ओळखा बरं असं आवाहन कराना दिसतो. रवींद्र जडेजानं केलेली नक्कल पाहून ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित सहकारी खेळाडूंना हसू आवरत नव्हतं. पण जडेजानं नक्कलच असली कमाल केलीय की त्याच्या सहकाऱ्यांनी पटकन ग्रॅम स्मिथचं नाव घेतलं आणि ड्रेसिंग रुममध्ये हशा पिकला. जडेजा अतिशय हुबेहुब ग्रॅम स्मिथच्या फलंदाजी शैलीची नक्कल करताना पाहायला मिळतोय. 

कॅप्टन असाच हवा; अफलातून खेळीनंतर ऋतुराज गायकवाड MS Dhoniबद्दल काय म्हणाला ऐका, Video

दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत २२० धावांचा डोंगर उभारला होता. यात सलामीवीर फॅफ डू प्लेसिसनं ६० चेंडूत नाबाद ९५ धावांची तुफान खेळी साकारली. तर ऋतूराज गायकवाड यांनं ६४ धावांचं महत्वाचं योगदान दिलं. चेन्नईच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा डाव २०२ धावांमध्ये संपुष्टात आला. चेन्नईकडून दीपक चाहर यानं सर्वाधिक ४ बळी घेतले. तर लुंगी निगिडी यानं ४ षटकात २८ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. सॅम कुरन यानं एक विकेट घेतली. 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सरवींद्र जडेजामहेंद्रसिंग धोनी