Join us  

IPL 2021: 'मुंबईचा संघ रोहित शर्मावर गरजेपेक्षा अधिक अवलंबून', कोहलीच्या प्रशिक्षकांची जोरदार टीका

IPL 2021, Rohit Sharma: आयपीएलमध्ये यंदा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला खूप संघर्ष करावा लागत असल्याचं दिसून येत आहे. मधल्या फळीतील फलंदाजांची निराशाजनक कामगिरी हेच यामागचं मोठं कारण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 4:39 PM

Open in App

IPL 2021, Rohit Sharma: आयपीएलमध्ये यंदा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला खूप संघर्ष करावा लागत असल्याचं दिसून येत आहे. मधल्या फळीतील फलंदाजांची निराशाजनक कामगिरी हेच यामागचं मोठं कारण आहे. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांच्या फॉर्मबाबत अनेक माजी क्रिकेटपटू विविध मतं व्यक्त करत आहेत. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांच्या वाइट कामगिरीबाबत बोलताना विराट कोहलीचे प्रशिक्षक राहिलेले राजकुमार शर्मा यांनी मोठं विधान केलं आहे. 

राजकुमार शर्मा यांच्या मतानुसार मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्मावर गरजेपेक्षा अधिक अवलंबून असल्याचं दिसून येत आहे आणि यामुळेच संघाला संघर्षाला सामोरं जावं लागत आहे. मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्यात अद्याप एकाही सामन्यात विजय प्राप्त करता आलेला नाही. 

आयपीएलमध्ये रोहित शर्मा सध्या त्याचा नैसर्गिक खेळ करताना दिसत नाहीय आणि यामागे इतर फलंदाजांकडून होत असलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे रोहितला थांबून फलंदाजी करावी लागत आहे. याआधी त्यानं अनेकदा आक्रमक सुरुवात केली. पण त्यानंतर त्याला संघाला सावरण्यासाठी फलंदाजीची गती संथ करावी लागली, असंही ते म्हणाले. 

"मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्मावर अधिक अवलंबून आहे. त्यामुळे त्याच्यावरही मोठा दबाव येतोय आणि त्याला मोठे फटके मारता येत नाहीयत. संघाची मधली फळी फॉर्ममध्ये नाही याची कल्पना त्याला आलीय. त्यामुळे रोहितच्या स्ट्राइक रेटमध्येही घसरण झालीय. संघ चांगली कामगिरी करत नसताना जबाबदारी घेऊन आवश्यकेतनुसार फलंदाजी करण्यासाठीच तुम्हाला कर्णधार केलं जातं. त्यामुळे आपण बाद झालो तर संघ कोसळेल या दबावाखाली रोहित शर्मा सध्या खेळतोय", असं राजकुमार शर्मा म्हणाले. 

मुंबई इंडियन्ससमोर प्ले-ऑफसाठी खडतर आव्हानआयपीएलच्या १४ व्या सीझनच्या पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्सनं सात पैकी चार सामन्यांत विजय प्राप्त करत ८ गुण प्राप्त केले होते. पण दुसऱ्या टप्प्यात मुंबईकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळत आहे. मुंबईनं सुरुवातीचे तिनही सामने गमावले आहेत. सद्यस्थितीला मुंबई इंडियन्ससह कोलकाता, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघ देखील ८ गुणांसह प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी कडवी झुंज देताना पाहायला मिळत आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२१रोहित शर्मामुंबई इंडियन्स
Open in App