Join us  

IPL 2021: ख्रिस गेल झालाय 'मिस्टर इंडिया'मधील अमरिश पुरींचा फॅन, पाहा खास Video

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये पंजाब किंग्जचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल सध्या चांगल्या फॉर्मात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:53 PM

Open in App

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये पंजाब किंग्जचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल सध्या चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या चार सामन्यांमध्ये गेलनं १२०.२० च्या स्ट्राइक रेटनं ११९ धावा केल्या आहेत. यात दोनवेळा चाळीस पेक्षा अधिक धावसंख्या केली आहे. संघाच्या विजयासाठी मैदानात टिकून राहण्याची जास्त गरज असताना गेलनं आपल्या आक्रमक फटक्यांना प्रसंगी मुरड घालून संयमानं फलंदाजी केल्याचंही पाहायला मिळालं आहे. (IPL 2021 Punjab Kings batsman Chris Gayle recreates Amrish Puri iconic dialogue from Mr India)

IPL 2021: धोनीनं जडेजावर सोपवली मोठी जबाबदारी; आज मॅक्सवेल मैदानात येताच होणार खेळ खल्लास!

ख्रिस गेल जसा मैदानात निडर होऊन खेळणं पसंत करतो तसाच तो मैदानाबाहेरही अतिशय धमाल करत असतो. ख्रिस गेलचा एक असाच धमाल व्हिडिओ सध्या जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. ख्रिस गेलनं १९८७ साली प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर इंडिया' या बॉलिवूड चित्रपटातील अभिनेते अमरिश पुरी यांचा एक सुप्रसिद्ध डायलॉग म्हटला आहे. 

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला फक्त एका खेळाडूची वाटते भीती, प्रशिक्षकांनी सांगितला प्लान!

अमरिश पुरी यांचं २००५ साली वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं. ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या अजरामर भूमिका त्यांची आठवण म्हणून आपल्या सोबत आहेत. अगदी वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल देखील अमरिश पुरींचे डायलॉग म्हणतो. मिस्टर इंडिया चित्रपटातील खलनायकाची भूमिका अमरिश पुरी यांनी साकारली होती आणि यातील 'मोगँबो खुश हुआ', हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता. गेलनंही हाच डायलॉग त्याच्या खास अंदाजात म्हटला आहे. पंजाब किंग्जच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. पंजाब किंग्जचं फिटनेस ट्रेनिंग सेशन सुरू असताना ख्रिस गेलनं अमरिश पुरी यांचा डायलॉग म्हटला आहे. 

पाहा व्हिडिओ...

टॅग्स :आयपीएल २०२१ख्रिस गेलपंजाब किंग्स