IPL 2021: धोनीनं जडेजावर सोपवली मोठी जबाबदारी; आज मॅक्सवेल मैदानात येताच होणार खेळ खल्लास!

IPL 2021, CSK vs RCB: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची सुरुवात एकदम दणक्यात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 11:12 AM2021-04-25T11:12:08+5:302021-04-25T11:12:39+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 dhoni could pit ravindra jadeja against maxwell in csk vs rcb match | IPL 2021: धोनीनं जडेजावर सोपवली मोठी जबाबदारी; आज मॅक्सवेल मैदानात येताच होणार खेळ खल्लास!

IPL 2021: धोनीनं जडेजावर सोपवली मोठी जबाबदारी; आज मॅक्सवेल मैदानात येताच होणार खेळ खल्लास!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, CSK vs RCB: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची सुरुवात एकदम दणक्यात झाली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगलोरनं सुरुवातीचे चारही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. बंगलोरच्या संघात यंदा ग्लेन मॅक्सवेलचा समावेश झाल्यानंतर संघ आणखीनच मजबूत झाला आहे. त्यात मॅक्सवेल देखील तुफान फॉर्मात आहे. (ipl 2021 dhoni could pit ravindra jadeja against maxwell in csk vs rcb match)

बंगलोरची आजची लढत चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध होत आहे. ग्लेन मॅक्सवेलला जाळ्यात अडकवण्यासाठी धोनी ब्रिगेडनं तयारी केली आहे. आरसीबीच्या विजयामध्ये ज्याचं मोठं योगदान राहिलं आहे त्याचा काहीच फरक पडणार नाही. कारण महेंद्रसिंग धोनी आज रवींद्र जडेजावर मोठा जबाबदारी देण्याची शक्यता आहे. 

आयपीएलमध्ये आज जेव्हा चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ एकमेकांना भिडतील तेव्हा दोन्ही संघांचं लक्ष्य हे विजयाचा रथ कायम ठेवणे हेच असणार आहे. चेन्नई सुपरकिंग्जनं पहिला सामना गमावल्यानंतर पुढचे तीनही सामने जिंकले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगोलरनं आतापर्यंत झालेले चारही सामने जिंकले आहेत. बंगलोरचा ग्लेन मॅक्सवेल चांगल्या फॉर्मात असल्यानं त्याला स्वस्तात बाद करण्याची रणनिती आखण्यावर धोनी अधिक भर देण्याची शक्यता आहे. 

मॅक्सवेलला अडवणार जडेजा
ग्लेन मॅक्सवेलला थोपवून ठेवण्यासाठी धोनी आज जडेजाच्या फिरकीचं अस्त्र प्रामुख्यानं वापरताना दिसेल. कारण जडेजाची मॅक्सवेल विरोधातील आकडेवारी अतिशय चांगली आहे. आरसीबीचा एक्स फॅक्टर मॅक्सवेल विरोधात जडेजा खतरनाक गोलंदाज ठरू शकतो. आतापर्यंत ११ टी-२० सामन्यांमध्ये जडेजा आणि मॅक्सवेल एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यात जडेजानं ५ वेळा मॅक्सवेलची विकेट घेतली आहे आणि त्याची सरासरी फक्त ११.६ इतकी राहिली आहे. मॅक्सवेलविरुद्धच्या याच दमदार आकडेवारीचा फायदा घेऊन धोनी जडेजाकडे मोठी जबाबदारी देण्याची दाट शक्यता आहे. 
सामना जिंकण्यासाठी मॅक्सवेल लवकर आऊट होणं महत्वाचं

ग्लेन मॅक्सवेलची विकेट चेन्नईसाठी इतकी महत्वाची का आहे याची माहिती यंदाच्या सीझनची आकडेवारीतूनच आपल्याला मिळेल. ग्लेन मॅक्सवेलननं गेल्या चार सामन्यांमधील तीन डावांमध्ये २ अर्धशतकं ठोकली आहे आणि विशेष म्हणजे यात मॅक्सवेलचा स्ट्राइक रेट तब्बल १५० इतका राहिला आहे. मॅक्सवेल यंदाच्या सीझनमध्ये आरसीबीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 
 

Web Title: ipl 2021 dhoni could pit ravindra jadeja against maxwell in csk vs rcb match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.