Join us  

IPL 2021 : PBKS vs DC T20 Live : एकाच वेळी दोघं Run Out; पंजाबच्या फलंदाजांचा गोंधळ पाहून आवरणार नाही हसू, Video

लोकेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानं आजच्या सामन्यात मयांक अग्रवाल पंजाब किंग्सचे नेतृत्व सांभाळत आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 8:48 PM

Open in App

ipl 2021 t20 PBKS vs DC live match score updates Ahmedabad : लोकेश राहुलच्या ( KL Rahul) अनुपस्थितीत पंजाब किंग्स संघ ( Punjab Kings) आज आयपीएल २०२१त दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) सामना करत आहे. पण, पंजाब किंग्सचे फलंदाज गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. 

प्रभसिमरन सिंग आणि मयांक अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली, परंतु सलग दुसऱ्या सामन्यात प्रभसिमरन सिंगला ( १२) अपयश आलं. कागिसो रबाडानं त्याचा बाद केले. त्यानंतर सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ख्रिस गेलनं खणखणीत षटकार मारून रबाडाचं स्वागत केलं. पण, पुढच्याच चेंडूवर रबाडानं त्याला चालतं केलं. रबाडानं १४४च्या वेगान टाकलेल्या फुलटॉस चेंडू गेलला खेळताच आला नाही अन् त्याचे दोन त्रिफळे उडाले...

पदार्पण करणाऱ्या डेवीड मलाननं आज कर्णधार मयांकसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना पंजाबचा डाव सावरला. पण, दिल्लीच्या गोलंदाजांना पंजाबच्या धावगतीला वेसण घातले होते. १४व्या षटकात विचित्र प्रकार पाहायला मिळाला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मयांक अग्रवालनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू टोलावला. मयांकला एक धाव घ्यायची होती, परंतु दीपक हुडा त्यासाठी तयार नव्हता. या सर्व गोंधळात दोन्ही फलंदाज एकाच दिशेला धावले अन् दोघंही धावबाद झाले, पण तिसऱ्या पंचांनी दीपक हुडाला धावबाद दिले. 

टॅग्स :आयपीएल २०२१मयांक अग्रवालदिल्ली कॅपिटल्सअक्षर पटेलपंजाब किंग्स