Join us

IPL 2021 : PBKS vs DC T20 Live : जबरदस्त, जबराट... १४४kmphच्या वेगानं टाकलेल्या चेंडूनं ख्रिस गेलचा उडवला त्रिफळा, Video 

दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पण, त्यांचे दोन फलंदाज अवघ्या ३५ धावांत माघारी परतले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 20:32 IST

Open in App

ipl 2021 t20 PBKS vs DC live match score updates Ahmedabad : लोकेश राहुलच्या ( KL Rahul) अनुपस्थितीत पंजाब किंग्स संघ ( Punjab Kings) आज आयपीएल २०२१त दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) सामना करत आहे. लोकेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानं आजच्या सामन्यात मयांक अग्रवाल पंजाब किंग्सचे नेतृत्व सांभाळत आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पण, त्यांचे दोन फलंदाज अवघ्या ३५ धावांत माघारी परतले. कागिसो रबाडानं १४४च्या वेगानं टाकलेला चेंडू अन् युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याचा उडालेला त्रिफळा, यानं सर्वांनाच अवाक् केले...

दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, शिमरोन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, कागिसो रबाडा, आवेश खान, इशांत शर्मा  

पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल, प्रभसिमरन सिंग, ख्रिस गेल, डेव्हिड मलान, दीपक हुडा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ख्रिस जॉर्डन, रिले मेरेडीथ, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी  

प्रभसिमरन सिंग आणि मयांक अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली, परंतु सलग दुसऱ्या सामन्यात प्रभसिमरन सिंगला ( १२) अपयश आलं. कागिसो रबाडानं त्याचा बाद केले. त्यानंतर सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ख्रिस गेलनं खणखणीत षटकार मारून रबाडाचं स्वागत केलं. पण, पुढच्याच चेंडूवर रबाडानं त्याला चालतं केलं. रबाडानं १४४च्या वेगान टाकलेल्या फुलटॉस चेंडू गेलला खेळताच आला नाही अन् त्याचे दोन त्रिफळे उडाले...

पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :आयपीएल २०२१ख्रिस गेलदिल्ली कॅपिटल्सपंजाब किंग्स