Join us  

अखेर पाकिस्तानी क्रिकेटपटूनं मान्य केलंच; पाकिस्तान सुपर लीग कुठे अन् IPL कुठे, ही तुलनाच होऊ शकत नाही! 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद जगजाहिर आहे. त्यामुळेच दोन देशांमधील क्रिकेट मालिकाही बंद आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 4:46 PM

Open in App

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद जगजाहिर आहे. त्यामुळेच दोन देशांमधील क्रिकेट मालिकाही बंद आहेत. 2008नंतर इंडियन प्रीमिअऱ लीगमधूनही पाकिस्तानी खेळाडूंची हकलपट्टी झाली आणि त्यामुळे आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पाकिस्तान सुपर लीग ( Pakistan Super League) सुरू केली. त्यांनी परदेशी खेळाडूंना करारबद्ध करून आयपीएलशी स्पर्धा सुरू केली. पण, आता पाकिस्तानी खेळाडू वाहब रियाझ ( Wahab Riaz) यानं स्वतः मान्य केले, की आयपीएलसमोर PSLची तुलनाच होऊ शकत नाही. 

35 वर्षीय रियाझनं सांगितले की, आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठे स्टार खेळतात. बीसीसीआय अन्य बोर्डांशी चर्चा करून आयपीएलसाठी विंडो तयार करून घेते. दुसरीकडे ज्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात संधी मिळत नाही, त्या खेळाडूंसह PSL खेळवली जाते. आयपीएलमध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या पगाराची रक्कमही मोठी असते, तर PSLमध्ये कमी पगार दिला जातो.   

''जगभरातील अनेक स्टार खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आतुर असतात. PSLची IPLसोबत तुलना होऊच शकत नाही. आयपीएलचा एक वेगळाच स्थर आहे. फक्त PSLच नव्हे, तर जगातील कोणतीच लीग IPLशी स्पर्धा करू शकत नाही. पण, गोलंदाजीच्या स्टँडर्डचा विचार केल्यास, PSL हे आयपीएलवर वरचढ ठरेल,''असेही तो म्हणाला.

FULL LIST OF PSL 2021 REPLACEMENT DRAFT PICKS 

  1. इस्लामाबाद युनायटेड ( Islamabad United) - उस्मान ख्वाजा ( अॅलेक्स हेल्स), जॅनेमन मलान ( लुईसल ग्रेगोरी)
  2. कराची किंग्स ( Karachi Kings) - मार्टीन गुप्तील ( कॉलीन इंग्राम), थिसारा परेरा ( मोहम्मद नबी), नजीबुल्लाह झाद्रान ( डॅन ख्रिस्टीयन), लिटन दास ( जो क्लार्क)  
  3. लाहोर कलंदर्स ( Lahore Qalandars) - शाकिब अल हसन ( राशिद खान), जेम्स फॉल्कनर ( डेव्हिड वीज), जो बर्न्स ( समित पटेल), कॅलम फर्ग्युसन ( टॉम अॅबेल), सीक्कूग प्रसन्ना ( जोए डेन्ली) 
  4. मुल्तान सुल्तान ( Multan Sultans) - महमुदुल्लाह ( ख्रिस लीन), रहमनुल्लाह गुर्बाज ( जेम्स व्हिन्सी), जॉर्ज लिंडे ( अॅडम लिथ), ओबेड मॅकॉय ( कार्लोस ब्रेथवेट) 
  5. पेशावर झाल्मी ( Peshawar Zalmi) - फॅबीयन अॅलन ( मुजीब उर रहमान), रोवमन पॉवेल ( लायम लिव्हिंगस्टोन), फिडेल एडवर्ड्स ( साकिब महमूद)  
  6.  क्यूएत्ता ग्लॅडिएटर्स ( Quetta Gladiators) - आंद्रे रसेल ( टॉम बँटन)  
टॅग्स :आयपीएल २०२१पाकिस्तानटी-20 क्रिकेट