Join us  

IPL 2021 : खराब कामगिरीमुळे संघाबाहेर गेला, पृथ्वी शॉने हरवलेला फॉर्म असा परत मिळवला, स्वत: उघड केले गुपित

Prithvi Shaw News : युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw ) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात सुरुवात केली होती. मात्र ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यातील सुमार कामगिरीनंतर त्याला भारतीय संघातून डच्चू मिळाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 4:00 PM

Open in App

मुंबई -  भारताला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणारा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw ) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात सुरुवात केली होती. मात्र ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यातील सुमार कामगिरीनंतर त्याला भारतीय संघातून डच्चू मिळाला होता. दरम्यान, पृथ्वी शॉने विजय हजारे करंडक आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत फॉर्म परत मिळवला आहे. दरम्यान, हरवलेला फॉर्म परत कसा मिळवला याचे गुपित पृथ्वी शॉ याने उघड केले आहे. (Out of the team due to poor performance, Prithvi Shaw regains lost form, reveals secrets)ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान संघाबाहेर गेलेल्य पृथ्वी शॉ ने हार मानली नाही. त्याने आपल्या फलंदाजीच्या तंत्रात काही आवश्यक बदल केला. त्याचा सकारात्मक परिणाम विजय हजारे करंडक आणि आयपीएलमध्ये दिसून येत आहे. याबाबत शॉ म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडल्यानंतर मला माझ्या तंत्राची चिंता वाटत होती. मी वारंवार त्रिफळाचित का होतोय हे मला कळत नव्हते. हे किरकोळ बाबीमुळे होत असे ना का मी हा दोष दूर करू इच्छित होतो. मी तिथेच हा दोष दूर करण्यावर काम सुरू केले. त्यानंतर फलंदाजीदरम्यान मी मुव्हमेंट नियंत्रि केले. ऑस्ट्रेलियातून परत आल्यावर मी प्रशिक्षक प्रशांत शेट्टी आणि प्रवीण आमरे यांच्याशी चर्चा केली. विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळण्यापूर्वी मी त्यांच्यासोबत नेट्समध्ये सराव केला. त्यांच्या सल्ल्यानंतर मी फलंदाजीत किरकोळ बदल केला. मग मी संपूर्ण स्पर्धेत बिनधास्तपणे खेळ केला. 

२१ वर्षीय पृथ्वी शॉ याने विजय हजारे करंडक स्पर्धेमध्ये मुंबईचे नेतृत्व केले या स्पर्धेत त्याने १६५ पेक्षा अधिकच्या सरासरीने ८२७ धावा फटकावल्या. या स्पर्धेत ८०० हून अधिक धावा फटकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. तर आयपीएलमध्येही त्याने चांगली सुरुवात केली आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी बिनधास्त खेळण्याची सूट दिली आहे. त्यामुळे या स्पर्धेत मी मोकळेपणाने खेळून संघाला चांगली सुरुवात करून देण्यात यशस्वी ठरत आहे, असे पृथ्वी शॉ याने सांगितले. 

टॅग्स :पृथ्वी शॉभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२१