Join us  

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या संघात कोरोना व्हायरसचा शिरकाव, प्रमुख सदस्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना कोरोना व्हायरस BCCIचं टेंशन वाढवताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 3:48 PM

Open in App

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना कोरोना व्हायरस BCCIचं टेंशन वाढवताना दिसत आहे. मंगळवारी वानखेडे स्टेडियमवरील दोन ग्राऊंड्समन आणि एका प्लम्बरसह स्टार वाहिनीच्या १४ क्रू सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा नितीश राणा, दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा देवदत्त पडीक्कल यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यात आता कोरोनानं गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात शिरकाव केला आहे. मुंबई इंडियन्सचे यष्टिरक्षक सल्लागार व भारताचे माजी यष्टिरक्षक किरण मोरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ( Mumbai Indians’ scout and wicket keeping consultant Mr. Kiran More has tested positive for Covid-19) 

मोरे यांच्यात कोणतीही लक्षण दिसत नाहीत आणि ते आयसोलेटेड झाले आहेत. मुंबई इंडियन्स आणि किरण मोरे यांनी बीसीसीआयच्या सर्व नियमांचं पालन केलं आहे. मुंबई इंडियन्सची वैद्यकिय टीम मोरे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे आणि बीसीसीआयच्या सूचनांचं पालन करत आहे. आम्ही चाहत्यांना हेच सांगतो की कोरोना संदर्भातील नियमांचं पालन करा व स्वतःला सुरक्षित ठेवा.  मोरे यांनी तीन मार्चला कोरोनाची लस घेतली होती. मोरे यांनी ४९ कसोटी सामन्यांत १२८५ धावा, ९४ वन डेत ५६३ धावा केल्या आहेत. त्यांनी कसोटीत ११० व वन डेत ६३ बळी टिपले आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सकोरोना वायरस बातम्या