IPL 2021 : सचिन तेंडुलकर दिसणार मुंबई इंडियन्सच्या मेंटॉरच्या भूमिकेत; अर्जुनला करणार मार्गदर्शन!

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या पर्वाला १९ सप्टेंबरला गतविजेत्या मुंबई इंडियन्स व माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामन्यानं सुरूवात होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 09:16 PM2021-09-12T21:16:10+5:302021-09-12T21:18:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Mumbai Indians Icon Sachin Tendulkar To Join Team In UAE; To Work With Son Arjun Tendulkar | IPL 2021 : सचिन तेंडुलकर दिसणार मुंबई इंडियन्सच्या मेंटॉरच्या भूमिकेत; अर्जुनला करणार मार्गदर्शन!

IPL 2021 : सचिन तेंडुलकर दिसणार मुंबई इंडियन्सच्या मेंटॉरच्या भूमिकेत; अर्जुनला करणार मार्गदर्शन!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या पर्वाला १९ सप्टेंबरला गतविजेत्या मुंबई इंडियन्स व माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामन्यानं सुरूवात होणार आहे. यूएईत पार पडणाऱ्या दुसऱ्या पर्वात महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसणार आहे. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) रविवारी सोशल मीडियावरून याची घोषणा केल्यानंतर चाहते आनंदात आहेत. तेंडुलकर यूएईत मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार आहे आणि त्यानिमित्तानं तो प्रथमच मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याला मार्गदर्शन करणार आहे.  

दडपणात शांत राहणे, हे मी सचिन तेंडुलकरकडून शिकलो; पॅरालिम्पिक पदकविजेता प्रमोद भगत

२००८मध्ये मुकेश अंबानी यांच्या संघानं सचिन तेंडुलकरला आयकॉन खेळाडू म्हणून करारबद्ध केले. २००८ ते २०१२ या कालावधीत तेंडुलकरकडे मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी होती. निवृत्तीनंतरही तो या फ्रँचायझीसोबत मेंटॉर म्हणून काम पाहत होता. तो अनेकदा मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुम व डग आऊटमध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसला आहे. आता तो यूएईतही दाखल होत आहे. त्यामुळे प्रथमच वडील-मुलगा अशी जोडीही आयपीएलच्या मैदानावर दिसणार आहे. अर्जुन तेंडुलकरला मागील लिलावात २० लाखांच्या मुळ किमतीत मुंबई इंडियन्सनं ताफ्यात दाखल करून घेतले. अर्जुन अजून एकही सामना खेळलेला नाही. 

Mumbai Inidian Matches Schedule  : 

  • 19 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 26 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 28 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
  • 5 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 8 ऑक्टोबर - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून

 

मुंबई इंडियन्सचा संघ ( IPL 2021 Mumbai Indians squad) - रोहित शर्मा, अॅडम मिल्ने, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लीन, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जिमी निशॅम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, मार्को जासेन, मोहसीन खान, नॅथन कोल्टर नायल, पियूष चावला, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युधवीर सिंग 

Web Title: IPL 2021: Mumbai Indians Icon Sachin Tendulkar To Join Team In UAE; To Work With Son Arjun Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.